आशालता करलगीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आशालता करलगीकर (इ.स. १९४३:वैजापूर, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र - ५ जानेवारी, २०१८) या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या.

करलगीकर यांनी संगीत महामहोपाध्याय पंडित स.भ. देशपांडे, डॉ. एन.के. कऱ्हाडे, पंडित व्ही.आर. आठवले यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. करलगीकरांनी देशभरात शास्त्रीय गायनाचे दोन हजार कार्यक्रम केले. तेलुगू चित्रपटांसाठी आणि १९६६ मध्ये आलेल्या ‘मुजरिम कौन’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. त्यांची आवड शास्त्रीय संगीताची अधिक होते. त्यांचे भक्क्तिसाततील गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना आंध्रलता हे नाव दिले. त्या संथ ख्याल गायन विशेष गात. सुगम गायन, भक्तिगीत, दादरा, गझल या प्रकारातही त्यांनी योगदान दिले. पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान यांच्यासोबत त्यांनी काबूल शहरात १९६३ साली गायन केले होते.

करलगीकर विश्वनाथ ओक ऑल इंडिया रेडियो वर सादर करीत असलेल्या स्वरशिल्प नावाच्या कार्यक्रमात गात गात असत. वडिलांच्या हैदराबादमधील वकीलीच्या व्यवसायामुळे संगीताचे शिक्षण तेथे झालेल्या करलगीकरांच्या गाण्यांचा बाज कर्नाटकी अंगाचा होता. त्यांचे शब्दोच्चारही दाक्षिणात्य असायचे. त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. गाण्यातला शब्दार्थ त्या स्वरांतून मांडत. पं. नाथराव नेरळकरांबरोबर त्यांनी देशभर हिंडून त्यांनी गझल मैफली केल्या.

त्यांच्या आवाजातला ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ हा एकनाथ महाराजांचा मराठी कूट अभंग प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैफलीत हा अभंग त्या नेहमी गात.

करलगीकर यांना सूरमणी, सूरश्री यांसारख्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.