आल्बेर कामु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आल्बेर कामु

आल्बेर कामु किंवा काम्यू (फ्रेंच albɛʁ kamy) (जन्म : ०७ नोव्हेंबर १९१३ मृत्यू : ०४ जानेवारी १९६०) हे एक फ्रेंच लेखक, कादंबरीकार आणि तत्त्ववेत्ते होते. १९५७ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे नाव अस्तित्ववादी विचारसरणीशी जोडले जात असले तरी त्यांना ते मान्य नव्हते. कुठल्याही विचारसरणीशी बांधील नसल्याचे त्यांनी १५ नोव्हेंबर १९४५ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका फ्रेंच मासिकातील मुलाखतीत स्पष्ट केले होते. "मी अस्तित्ववादी नाहीच, पण आमचे नाव या विचारसरणीशी जोडले जात असल्याचे पाहून मी आणि सार्त्र अचंबित होतो....[१]

जीवनचरित्र[संपादन]

कामूचा जन्म अल्जी़रियात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील सामान्य शेतकरी होते. कामूचे दोन विवाह झाले. त्याची पहिली पत्नी सिमॉ हाई ही होती. पण हा विवाह टिकला नाही. परिणामी कामूचा विवाहसंस्थेवरील विश्वास उडाला. तरीही एका बुद्धिमान गणिती आणि पियानोवादक फ्रान्सिन फॉर या तरुणीशी त्याने विवाह केला, पण तिच्याशी त्याचे सतत खटके उडत. हे नातेही संपले. कामूला कॅथरीन आणि जीन या दोन जुळ्या दोन मुली होत्या.दरम्यान कामूची अनेक प्रेम प्रकरणेही झाली. त्यातील मारिया सीझर्स या स्पॅनिश अभिनेत्रीशी त्याचे प्रकरण गाजले.

साहित्य संपदा[संपादन]

कादंबरी[संपादन]

 • The Stranger (L'Étranger, The Outsider या नावाने भाषांतरित १९४२)
 • The Plague (La Peste, १९४७ )
 • The Fall (La Chute १९६५)
 • A Happy Death (La Mort heureuse) (लेखनकाल १९३६-३८, प्रकाशन १९७१ मरणोत्तर)
 • The First Man (Le premier homme) (अपूर्ण published प्रकाशन १९९५ मरणोत्तर)

लघुकथा[संपादन]

ललितेतर[संपादन]

नाटके[संपादन]

निबंध[संपादन]

निबंध संग्रह[संपादन]

 • Resistance, Rebellion, and Death (१९६१)[५]
 • Lyrical and Critical Essays (१९७०)
 • Youthful Writings (१९७६)
 • Between Hell and Reason: (१९९१)
 • Camus at "Combat": (२००५)
 • Albert Camus Contre la Peine de Mort (२०११)

निवडक चरित्रे[संपादन]

हेही वाचा[संपादन]

हे पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Les Nouvelles littéraires", 15 November 1945
 2. ^ Harvard University Press (ISBN 978-0674072589)
 3. ^ Betwixt and Between by James Campbell - Wall Street Journal (May 3, 2013 review)
 4. ^ Resistance, Rebellion, and Writing, by George Scialabba - bookforum.com April / May 2013
 5. ^ Orme, Mark (2007). The Development of Albert Camus's Concern for Social and Political Justice, Fairleigh Dickinson University Press, ISBN 0838641105