ऑर्थर कॉनन डॉयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्थर कॉनन डॉईल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सर आर्थर कॉनन डॉयल
Conan doyle.jpg
जन्म नाव आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल
जन्म मे २२, इ.स. १८५९
एडिनबरो, स्कॉटलंड
मृत्यू जुलै ७, इ.स. १९३०
क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड
राष्ट्रीयत्व स्कॉटिश
कार्यक्षेत्र साहित्यिक, डॉक्टर
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार हेरकथा, ऐतिहासिक कादंबरी, ललितेतर साहित्य
प्रभाव एडगर ॲलन पो
प्रभावित ऍगाथा ख्रिस्ती आणि इतर हेरकथाकार
स्वाक्षरी ऑर्थर कॉनन डॉयल ह्यांची स्वाक्षरी

सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल (इंग्लिश: Arthur Ignatius Conan Doyle ;) (मे २२, इ.स. १८५९; एडिनबरो, स्कॉटलंड - जुलै ७, इ.स. १९३०; क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड) हा स्कॉटिश लेखक होता. त्याने इंग्रजी भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात.

सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी : -

 • द व्हॅली ऑफ फिअर (कादंबरी)(प्रवीण जोशी)
 • शाबास, शेरलॉक होम्स! (भा.रा. भागवत) - पाच पुस्तके
 • शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६ (भालबा केळकर)
 • शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स (प्रवीण जोशी)
 • शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सच्या कर्तृत्व कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सच्या पाच कथा (बिंबा केळकर) - द ॲडव्हेंचर्स ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिलव्हर्टन (घात आणि आघात), द डिसॲपिरन्स ऑफ लेडी फ्रॅन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम ॲन्ड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाटय)
 • शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन (पंढरीनाथ सावंत)-"द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या
 • संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
 • साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिक्वोट
ऑर्थर कॉनन डॉयल हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.