आरिफ बेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आरिफ बेग (फेब्रुवारी २,इ.स. १९३६-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील धार लोकसभा मतदारसंघातून तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातीलच बेतूल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.भारतीय जनता पक्षात मुस्लिमांवर अन्याय होत आहे असा आरोप करून त्यांनी इ.स. १९९६ च्या निवडणुकांपूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.