आय.एन.एस. विंध्यगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आय.एन.एस. विंध्यगिरी (एफ४२) ही भारतीय नौदलाची निलगिरी प्रकारची फ्रिगेट आहे. ही लढाऊ नौका जुलै ८, इ.स. १९८१ रोजी सेवेत रुजू झाली.

जानेवारी २०११ अपघात आणि जलसमाधी[संपादन]

जानेवारी ३०, इ.स. २०११ रोजी विंध्यगिरीला मुंबईनजीक संकरॉक दीपगृहाजवळ एम.व्ही. नॉर्डलेक या मालवाहू नौकेने जोरदार धडक दिली. यावेळी विंध्यगिरीवर नौसैनिकांची कुटुंबेही होती. या अपघातात जीवितहानी झाली नाही. जानेवारी ३१ रोजी बचावकार्य सुरू असतानाच विंध्यगिरीने जलसमाधी घेतली. काहीच दिवसांपूर्वी या फ्रिगेटला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.[१] ११ जून, २०१२ रोजी ही नौका अधिकृतरीत्या निवृत्त झाल्यावर आता तिचा उपयोग नेमबाजीच्या सरावासाठी करण्यात येईल.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. http://72.78.249.107/esakal/20110131/5136766272434638427.htm दै. सकाळमधील बातमी