आमच्या आयुष्यातील काही आठवणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे श्रीमती रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव आहे. या आत्मचरित्राची प्रथम आवृत्ती ही १९१० साली प्रकाशित झाली. ‘उंच माझा झोका’ हा झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम या आत्मचरित्रावर आधारलेला होता. रमाबाईनी या आत्मचरित्रातून महादेव गोविंद रानडे यांचे चरित्रच रेखाटलेले आहे असे वाचल्यावर लक्षात येते.