Jump to content

पन्हाळ्याची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आपटीची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)

पन्हाळ्याची लढाई जून १७१९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झाली. ही लढाई पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्यात झाली. या लढाईत यशवंतरावाचा पराभव झाला आणि त्यातच तो मृत्यू पावला.

पन्हाळ्याची लढाई
कोल्हापूर-सातारा गादीचे युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक जून १७१९
स्थान आप्टी, पन्हाळा, महाराष्ट्र
परिणती शाहुचा विजय
युद्धमान पक्ष
कोल्हापूर गादी सातारा गादी
सेनापती
यशवंतराव थोरात बाळाजी विश्वनाथ
पिलाजी जाधवराव
सैन्यबळ
२,००० घोडदळ
१,००० पायदळ
१५,००० घोडदळ
२,००० पायदळ

पार्श्वभूमी

[संपादन]

मे १७१९मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ दिल्लीतून सनदा प्राप्त करून साता-यात आले. त्यावेळेस छत्रपती शाहूंनी बाळाजींना कोल्हापूरकर छत्रपती संभाजींचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण मोहीम सांगितली. तेव्हा बाळाजीने अष्टप्रधानातील पिलाजी जाधवराव, काही मंत्री आणि सैन्य घेऊन दक्षिणेत कूच केली.

आष्ट्याचे ठाणे

[संपादन]

त्यावेळेस वारणा खो-याचा प्रदेश हा सातारा व कोल्हापूर राज्याच्या सीमेलगतचा महत्त्वाचा प्रदेश होता. आष्ट्याचे ठाणे हे वारणा खो-यातील मुख्य ठिकाण होते, म्हणून बाळाजीने आष्ट्याच्या ठाण्यावर हल्ला करण्याचे योजिले. त्यावेळेस वारणा खो-याचा प्रदेश आणि आष्ट्याचे ठाणे हे कोल्हापूरकर छत्रपतींच्या मंत्रीमंडळातील यशवंतराव थोरात याच्या ताब्यात होता. तेव्हा यशवंतराव विजापूर प्रांतात मोहीमेवर होता. त्याला बाळाजीच्या हल्ल्याची माहिती समजताच तो स्वतःच्या सैन्यासहीत आष्ट्याच्या ठाण्यात आला. बाळाजीच्या हल्ल्याची बातमी कोल्हापूरकर छत्रपतींना कळवण्यासाठी काही सैन्य आष्ट्याच्या ठाण्यात ठेवून यशवंतरावाने पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. बाळाजीने आणि पिलाजीने आष्ट्याच्या ठाण्याला वेढा घातला. काही दिवसातच आष्ट्याचे ठाणे काबीज झाले.

लढाई

[संपादन]

लढाईचे परिणाम

[संपादन]

पन्हाळ्याची लढाई झाल्यानंतरही बाळाजीने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. परंतु लढाईत झालेल्या हानीमुळे बाळाजीला माघार घ्यावी लागली. या लढाईनंतर शाहु आणि कोल्हापुरकर संभाजी यांच्यात यह.

संदर्भ

[संपादन]
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा (१७००-१७६०) – वि. का. राजवाडे, संदर्भ क्र.१.