आप्टी
Appearance
आपटी याच्याशी गल्लत करू नका.
आप्टी हे पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव आहे. या गावात सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांची समाधी आहे. या गावात १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्यातली प्रसिद्ध लढाई झाली. ती लढाई 'आप्टीची लढाई' म्हणून ओळखली जाते. या लढाईत उदाजी चव्हाण यांनी यशवंतरावांना धोक्याने मारले असे सांगितले जाते.