Jump to content

आनंद मठ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद मठ हा भारतीय ऐतिहासिक देशभक्तीपर चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत आहे. इ.स.१८८२ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी बंगाली भाषेत ‘आनंदमठ’ही कादंबरी लिहिली. या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.

कथानक

[संपादन]

हा चित्रपट बंगालमधील १८ व्या व १९ व्या शतकातील संन्यासी आणि ब्रिटिश यातील स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. २००३ साली १६५ देशांत आयोजित करण्यात आलेल्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या सर्वेक्षणात लता मंगेशकर यांनी गायलेले, बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ गाणे हे जगातील "टॉप टेन" गाण्यांमध्ये दुसरे होते.

दिग्दर्शन

[संपादन]

या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत गुप्ता हे आहेत.

प्रमुख कलाकार

[संपादन]

या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, भरत भूषण, गीता बाली, प्रदीप कुमार आणि अजित यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार हे होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]