Jump to content

आजानुबाहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आजानुबाहू शब्द अनेक अर्थाने वापरला जातो.

ज्याचे बाहू (हात, भुजा) त्याच्या गुडघ्यापर्यंत (अ-जानु) पोहोचतात त्याला आजानुबाहू म्हणतात. भारताच्या इतिहासात राम (पहा - ध्यायेत् आजानुबाहू धृतशरधनुषम् ..बुधकौशिकऋषिलिखित रामरक्षा.) [][]

जैन तीर्थंकरांच्या मूर्तीही आजानुबाहू दाखवतात.[] शिर्डीचे साई बाबा, रामकृष्ण परमहंस, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हेही आजानुबाहू होते असे सांगितले जाते.

बौद्ध धर्मामध्ये कधीकधी त्याला 'पातुरबाहता' [] किंवा स्थितानवनताजानुप्रलम्बबाहुः असे म्हणले जाते.[] अजानुबाहू असणे हे महापुरुषांच्या बत्तीस गुणांपैकी एक आहे आणि हे सर्व गुण गौतम बुद्धांमध्ये होते.

जाटव किंवा जाटव राजा-आजानुबाहू जातवाशी हा १६व्या शतकातील छिंदवाडा आणि नागपूरच्या गोंड राजघराण्याचा संस्थापक होता. त्याची बोटे त्याच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत, म्हणून त्याला 'आजानुबाहू जातवाशी' म्हणत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Arora, Udai Prakash (2007). Udayana: New Horizons in History, Classics and Inter-Cultural Studies By Abhay Kumar Singh, Udai Prakash Arora. p. 405. ISBN 9788179751688.
  2. ^ Ajanbahu Jatbasha, was eighth in descent from the founder of the dynasty, and was so called because of the length of his arms, his fingers reaching to his knees Chhindwara, Central Provinces (1907) pp 28
  3. ^ Padmakara Translation Group (2018). "The Transcendent Perfection of Wisdom in Ten Thousand Lines". 84000: Translating the Words of the Buddha. 2019-12-25 रोजी पाहिले.
  4. ^ Gelongma Karma Migme Chödrön; Migme, Ani (translator) (2001). "Chapter VIII - The Bodhisattvas". Maha Prajnaparamita Sastra.
  5. ^ [१] Chhindwara, Central Provinces (1907) pp 28