Jump to content

आकारहीन दीर्घिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एनजीसी १४२७ए (NGC 1427A), ५.२ कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील आकारहीन दीर्घिका.

सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे निश्चित आकार नसणाऱ्या दीर्घिकांना आकारहीन दीर्घिका (इंग्रजी: Irregular galaxy - इर्रेग्यूलर गॅलॅक्सी) म्हणतात.[]  आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते हबल अनुक्रमाच्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सर्पिलाकार फाटेही नसतात.[]

एकूण दीर्घिकांपैकी यांची संख्या एकत्रितपणे एक चतुर्थांश आहे असे मानले जाते. काही आकारहीन दीर्घिका एकेकाळी सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार होत्या, पण गुरुत्वीय बलातील विषमतेमुळे त्यांचा आकार अनियमित झाला. आकारहीन दीर्घिकांमध्ये विपुल प्रमाणात वायु व धूळ असू शकते.[] हे बटू (ठेंगण्या) आकारहीन दीर्घिकांसाठी अपरिहार्यपणे खरे नाही.[]

प्रकार

[संपादन]

आकारहीन दीर्घिकांचे तीन मुख्य प्रकार आहेत:[]

  • आयआरआर-१ (Irr  I) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकेचा आकार थोड्या प्रमाणात रचनाबद्ध असतो, पण हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करण्याएवढा स्पष्ट नसतो.
    • काही प्रमाणात सर्पिलाकार रचना असणाऱ्या उपप्रकाराला एसएम (Sm) दीर्घिका म्हणतात.
    • सर्पिलाकार रचना नसणाऱ्या उपप्रकाराला आयएम (Im) दीर्घिका म्हणतात.
  • आयआरआर-२ (Irr II) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकांमध्ये कोणत्याही प्रकारची रचना नसते ज्याच्या आधारे त्यांचे हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करता येईल.
  • डीआय-दीर्घिका (dIrrs): ही बटू आकारहीन दीर्घिका आहे.[] या प्रकारच्या दीर्घिका एकूणच दीर्घिकांच्या उत्क्रांतीचे आकलन होण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात, कारण शक्यतो त्यांची मेटॅलिसिटी कमी असते, त्यांच्यामध्ये वायू व धुळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि या दीर्घिका विश्वातील सर्वात पहिल्या दीर्घिकांसारख्या आहेत असे मानले जाते.

मॅजेलॅनिक ढग

[संपादन]

मॅजेलॅनिक ढग दीर्घिकांचे पूर्वी आकारहीन दीर्घिकांमध्ये वर्गीकरण केले जायचे. नंतर मोठ्या मॅजेलॅनिक ढगाचे वर्गीकरण एसबीएम (SBm)[] या भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेच्या एका प्रकारामध्ये करण्यात आले. लहान मॅजेलॅनिक ढगाचे वर्गीकरण आकारहीन दीर्घिका प्रकार आयएम (Im) असेच केले जाते.

गॅलरी

[संपादन]

हेही पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Butz, Stephen D. (2002).
  2. ^ Morgan, W. W. & Mayall, N. U. (1957).
  3. ^ Faulkes Telescope Educational Guide - Galaxies - Irregulars
  4. ^ Walter, F. et al.
  5. ^ Gallagher, J. S. & Hunter, D. A. (1984). "Structure and Evolution of Irregular Galaxies." Annual Review of Astronomy and Astrophysics. 22: 37-74. doi:10.1146/annurev.aa.22.090184.000345.
  6. ^ ग्रेब्रेल, एवा, के. द इव्होल्यूशनरी हिस्टरी ऑफ लोकल ग्रूप इर्रेग्यूलर गॅलॅक्सीज (इंग्रजी भाषेत). pp. २३४-२५४.
  7. ^ Corso, G. and Buscombe, W. The Observatory, 90, 229 - 233 (1970) On the spiral structure of the Large Magellanic Cloud