आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया चालु

आंत्रपुच्छमध्ये जंतुदोष झाल्याने त्यात पू, आजूबाजूच्या आवरणाला सूज, इत्यादी दुष्परिणाम होतात. आंत्रपुच्छदाहात पोटात विशिष्ट जागी दुखते, दुखरेपणा येतो, उलटया होतात व नंतर ताप येतो. कधी कधी आंत्रपुच्छच्या भागात सूज, गोळा येतो. आंत्रपुच्छाच्या अस्तराला जखमा होतात, जिवाणू आंत्रपुच्छाच्या आवरणात शिरकाव करतात. आता आंत्रपुच्छाचा दाह होतो, आंत्रपुच्छाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या अकार्यक्षम होतात, आंत्रपुच्छाच्या टोकाला रक्ताचा पुरवठा कमी पडू लागतो. आंत्रपुच्छाचे टोक रक्ताअभावी निर्जीव होते, आंत्रपुच्छ फुटते.

आजार[संपादन]

आंत्रपुच्छदाह हा गंभीर आजार आहे. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. आंत्रपुच्छ बंद होण्याचे दुसरे कारण (तीस टक्के रुग्णांत) म्हणजे मलाचा खडा आंत्रपुच्छात अडकणे.

लक्षणे[संपादन]

 • सुरवातीला बेंबीच्या आसपासची जागा अथवा वरच्या पोटात दुखते.
 • बारा ते चोवीस तासांत जागा बदलून उजवीकडे खाली (मॅकबरनीज् जागा) दुखू लागते. हालचालीने, खोकण्याने अथवा शिंकण्याने दुखणे वाढते.
 • ८० ते ९० टक्के रुग्णांना भूक लागेनाशी होते. काहींना उलटी होते.
 • ताप येतो, तो सहसा सौम्य असतो. थंडी वाजून जोरात ताप येणे, हे आंत्रपुच्छ फुटले असण्याची शक्‍यता दर्शविते.
 • उजव्या बाजूला खाली हलका दाब दिला तरी दुखणे जाणवते. उजवा पाय उचलण्याचा प्रयत्न करताना किंवा उजवा पाय कमरेतून मागे (डाव्या कुशीवर पडून) नेताना वेदना होतात.
 • आंत्रपुच्छ वेदना व दाब दिल्यावर येणारा प्रतिसाद कमी येतो व सोडल्यास वेदना वाढतात.

तपासण्या[संपादन]

उपचार[संपादन]

आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्याचे दोन प्रकार आहेत.

 • पारंपारिक शस्त्रक्रिया-
  • यात जिवाणुरहित काळजी घेऊन स्पायनल पध्दतीची भुल दिली जाते, ज्यात कमरेच्या मनक्यात सुई द्वारे भुलीचे औषध सोडले जाते. यात कमरेपासून खालील भाग संवेदनाहीन होतो.
  • जिवाणुरहित काळजी घेऊन पोटाच्या खालील उजव्या भागात छेद घेतला जातो.
  • स्नायु वेगळे करून उदरपोकळीत आंत्रपुच्छ शोधले जाते.
  • आंत्रपुच्छला मुळाशी दोऱ्याने बांधून वेगळे केले जाते.
  • प्रत्येक परत व्यवस्थितपणे शिवले जाते.
 • लॅपरोस्कोपी पध्दतीने