अ‍ॅन हॅथवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅन हॅथवे
जन्म अ‍ॅन जॅकलिन हॅथवे
१२ नोव्हेंबर, १९८२ (1982-11-12) (वय: ३५)
ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९९ - चालू

अ‍ॅन जॅकलिन हॅथवे (इंग्लिश: Anne Jacqueline Hathaway; जन्म: १२ नोव्हेंबर १९८२) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. अनेक नाटकांमध्ये कामे केल्यानंतर हॅथवेने १९९९ साली टीव्ही मालिकेमध्ये भूमिका केल्या. सिम्पसन्स ह्या कार्टून मालिकेमध्ये तिने दिलेल्या आवाजासाठी तिला एमी पुरस्कार मिळाला होता.

२००१ साली हॅथवेने हॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. २००८ साली प्रदर्शित झालेल्या रेचल गेटिंग मॅरिड ह्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार व ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या क्रिस्टोफर नोलनच्या द डार्क नाईट राइझेस ह्या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.

२००६ साली हॅथवेला पीपल्स मासिकाच्या जगातील ५० सर्वात सुंदर व्यक्ती ह्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: