अहिल्यानगरी एक्सप्रेस
अहिल्यानगरी एक्सप्रेस किंवा अहिल्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे ची मेल/एक्सप्रेस गाडी मध्यप्रदेशच्या इंदूर पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम पर्यंत धावणारी गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.[१]
संख्या आणि परिभाषा
[संपादन]गाटी क्रमांक | तपशील |
---|---|
16325 | इंदूर जंक्शन ते त्रिवेंद्रम सेंट्रल |
16326 | त्रिवेंद्रम सेंट्रल ते इंदूर जंक्शन |
नाव
[संपादन]या गाडीला इंदूर संस्थानच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले गेले आहे. इंदूर शहराचे नाव पूर्वी नाव अहिल्यानगरी होते.[२]
वेळापत्रक
[संपादन]ट्रेन क्रं. | प्रस्थान वेळ | प्रस्थान स्टेशन | आगमन स्टेशन | वार |
---|---|---|---|---|
16325 | 4:40 पी.एम. | इंदूर जंक्शन | त्रिवेंद्रम सेंट्रल | सोमवार |
16326 | 5:00 ए.एम. | त्रिवेंद्रम सेंट्रल | इंदूर जंक्शन | सोमवार |
ट्रेन मार्ग आणि थांबे
[संपादन]ही ट्रेन खालील मार्गाने धावते : इंदूर जंक्शन, देवास जंक्शन,उज्जैन जंक्शन,शूजलापूर,भोपाल जंक्शन,भोपाल हबिबगंज,होसांगाबाद,इटारशी जंक्शन,घोर डोंगरी, अमला जंक्शन,बैतुल,नागपूर,चंद्रपूर,बललरशाह,वरंगळ,खम्माम,विजयवाडा जंक्शन,चेन्नई सेंट्रल,अरक्कोनाम जंक्शन, कटपडी,सेलम जंक्शन, एरोड जंक्शन,कोइंबतूर जंक्शन,पालक्कड जंक्शन,थृस्सुए रेल्वे स्थानक,एरणाकुलम जंक्शन,अलाप्पूझा,कोललं जंक्शन त्रिवेंद्रम सेंट्रल.[३]
बोगी व्यवस्था
[संपादन]या ट्रेन ला सामान्यतः 23 बोगी असतात. त्यात
- 2 द्वितीयश्रेणी वातानुकूलित ( टू टायर )
- 2 तृतीय श्रेणी वातानुकूलित ( थ्रि टायर )
- 1 भोजन व्यवस्था
- 14 श्ययन यान
- 4 सामान्य
सरासरी वेग आणि आवक जावक काळं
[संपादन]या ट्रेनचा तासी 55 किमी सरासरी वेग आहे आणि दोन्ही ठिकाणाहून ती साप्ताहिक पद्धतीने धावते.[४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "इंदूर रेल्वे स्थानक ला 20 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर".
- ^ "अहिल्यानगरी एक्सप्रेस सेवा". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-08 रोजी पाहिले.
- ^ "अहिल्यानगरी एक्सप्रेस (22645) अनुसूची / रूट".
- ^ "१६३२५ अहिल्यानगरी एक्ष्प्रेस्स वेळापत्रक". 2016-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-08 रोजी पाहिले.