असंही एक साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

असं ही एक साहित्य संमेलन या नावाचे एक साहित्य संमेलन ७ मार्च२०१३ रोजी मुंबईत दादरला शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाले. नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी ते भरवले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे राहून जे साहित्यिक निवडून येत नाहीत, अशांचे हे संमेलन होते. चिपळूणला भरणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे असलेल्या ह.मो. मराठे यांना ऐन वेळा माघार घ्यावी लागली होती. त्यांमुळे त्यांचे साहित्यविषयक विचार मराठी रसिक श्रोत्यांना ऐकता आले नव्हते. या असं ही एक साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदावरून केलेल्या भाषणामुळे ह.मो. मराठे यांची साहित्यविषयक भूमिका श्रोत्यांना समजून घेता आली.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा.प्रतिमा इंगोले तर उद्‌घाटक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी होते. कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी मराठे यांनी केले; ध्वनिसंयोजक प्रशांत लळीत होते.

संमेलनात झालेले अन्य कार्यक्रम -

  • ’बोला हमो बोला’ - ह.मो.मराठे यांची रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांनी घेतलेली सडेतोड मुलाखत.
  • किती किती गोड - राजा बढे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम. सादरकर्ते : अद्वैत लोणकर, जयंत पिंगुळकर, नीलिमा गोखले, बकुळ पंडित, श्रीरंग भावे वगैरे.

दिवाळी अंकांच्या लेखकांसाठी साहित्य संमेलन[संपादन]

असं ही एक साहित्य संमेलन या नावाचे आणखी एक साहित्य संमेलन २५ डिसेंबर २०१७ रोजी मुंबई दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाले. 'ऋतुरंग'कार अरुण शेवते या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनात दिवाळी अंकांत लिहिणारे लेखक, मुख्य प्रवाहात नसलेले नवोदित लेखक आणि एखाददुसरी कथा-कविता लिहिणारे लेखक-कवी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. हेही संमेलन रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी भरवले होते.

सातत्याने २५ वर्षे दर्जेदार दिवाळी अंक काढणारे 'ऋतुरंग'चे संपादक अरुण शेवते, दुर्धर आजाराचा सामना करीत 'कॅलिडोस्कोप' हे पुस्तक लिहिणारी सृष्टी कुलकर्णी आणि विक्रमी खपाच्या दिवाळी अंकांची निर्मिती कराणारा झी समूह यांना या संमेलनादरम्यान पुरस्कृुत करण्यात आले.

पहा : मराठी साहित्य संमेलने