अशोक समेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मनोहर समेळ हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार, नाट्यअभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर (२०१८ सालापर्यंत) ५७ नाटके लिहिली आहेत व १८ दिग्दर्शित केली आहेत. रंगमंचीय नाटकांखेरीज त्यांनी आकाशवाणीवरील कार्यक्रम, दूरदर्शन मालिका अशा विविध ठिकाणी लेखक-दिग्दर्शक-अभिनेता म्हणून काम केले आहे.

वयाच्या सातव्या वर्षांपासून अशोक समेळ यांना वाचनाचा छंद जडला. ते दक्षिण मुंबईतील सेन्ट्रल बँकेत नोकरी करत असताना दादर ते चर्चगेट या प्रवासात पुस्तक वाचीत जात. वाचनाच्या याच आवडीने त्यांनी चौदा हजार रुपयांची पुस्तके खरेदी करून आसपासच्या रहिवाशांसाठी वाचनालय सुरू केले. ‘अश्वत्थामा’ ही ६८८ पानांची कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी महाभारताचे १८ खंड, विष्णुपुराण, रुद्रपुराण, हरिवंशपुराण, शोकात्म विश्वपुराणदर्शन इत्यादीचे वाचन केले.

अशोक समेळ यांनी मराठी नाटकांशिवाय २३ गुजराथी नाटके, ९ प्रायोगिक नाटके, तसेच दूरदर्शन वरील मालिकांचे २००० पेक्षा जास्त भागांचे लेखनही केले आहे. अनिल बर्वेंंच्या अनेक कादंबऱ्यांची त्यांनी नाट्य रूपांतरे केली व स्पर्धेत बक्षिसे मिळवली. यानाटकांमुळे , नाव मिळवलं आणि अशोक समेळ हा एक नाटककार उदयाला आला.

अशोक समेळ ह्यांनी ठाणे शहरात तेथील महापालिकेच्या साहाय्याने व महापौरांच्या मदतीने टेंभीनाका येथे प्रायोगिक चळवळ सुरू केली. या नाट्य-चळवळीमार्गे ठाण्यातील गोरगरीब व सर्वसाधारण थरातल्या विद्यार्थ्यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करतात. या प्रायोगिक चळवळीतून त्यांनी सर्व ठाणेकरांना घेऊन “संन्यस्त ज्वालामुखी” हे ४० तासात सलग ११ प्रयोग करणारे विक्रमी नाटक सादर केले होते. हा विक्रम “लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोदला गेला आहे.

अशोक समेळ यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या[संपादन]

  • मी अश्वत्थामा... चिरंजीव
  • स्वगत (आत्मचरित्र)

अशोक समेळ यांची नाटके (५७ लेखन आणि १७ अभिनय)[संपादन]

  • अवघा रंग एकचि झाला (संगीत नाटक) - दिग्दर्शन
  • अश्रूंची झाली फुले (अभिनय व दिग्दर्शन)
  • इथे ओशाळला मृत्यू (अभिनय)
  • कुसुम मनोहर लेले (लेखन)
  • जन्मदाता (दिग्दर्शन)
  • डोंगर म्हातारा झाला (रूपांतरित नाटक, लेखन) (अशोक समेळ यांचे पहिले नाटक) (मूळ कादंबरी लेखक - अनिल बर्वे)
  • तो मी नव्हेच (अभिनय)
  • नटसम्राट (दिग्दर्शन)
  • परपुरुष (लेखन व दिग्दर्शन)
  • पुत्रकामेष्टी (निर्मिती आणि दिग्दर्शन)
  • मी मालक या देशाचा (अभिनय)
  • राजा रविवर्मा (दिग्दर्शन)
  • संगीत शंकरा (लेखन व दिग्दर्शन)
  • संन्यस्त ज्वालामुखी (निर्मिती)
  • १६हून अधिक दूरचित्रवाणी मालिका (अभिनय)
  • ज्ञानोबा माझा (लेखन व दिग्दर्शन)

अशोक समेळ यांचे चित्रपट[संपादन]

अशोक समेळ यांना मिळालेले पुरस्कार (एकूण ३४हून अधिक)[संपादन]