अशोक पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अशोक पवार

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ शिरुर

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
धर्म हिंदू धर्म

अ‍ॅड. अशोकबापू पवार म्हणजे नागरिकांसाठी सातत्याने तत्पर, अडीअडचणीत धावून जाणारे, नागरिकांचे प्रश्न आपले समजून त्याची सोडवणूक करणारे आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व...   

  शिरूर हवेली मतदार संघ महाराष्ट्रात आदर्श बनवायचा हाच त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ते जिद्दीने पूर्ण करण्याचे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगले आहे. आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर, मा.माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठबळामुळे ते सातत्याने अविरत कार्य करत आहेत.

  मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणे, मग यात रस्ते, पाणी, वीज, युवा आणि महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती अशा सर्व बाजूने विकास करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या समजवून घेऊन त्या सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी तब्बल तीन लाख पत्रे नागरिकांपर्यंत पोहचविली. त्यावर नागरिकांनी उत्तरेही दिली. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर वरून त्यांनी संपर्क साधला. नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा तक्रारी जाणून घेऊन, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर उत्तर म्हणून त्यांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली. शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून  बांधावरचे तंटे सोडवले, बांधावर खते वाटप केले, व स्थानिक प्रशासन अधिक गतिमान बनवले.

अनेक वर्षात न झालेला विकास त्यांच्याच कार्यकाळात घडला. मतदारसंघाला मिळणारा संजय गांधी निराधार योजनेचा निधी ९७ हजारांवरून २० लाखांच्या वर गेला. खूप कमी वेळात वशिलेबाजी न होता आणि वर्गणी गोळा न करता ट्रान्सफॉर्मर मिळू लागले, अनेक ठिकाणी वीज जोडणी मिळाली, रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची कामे आणि त्यांचा दर्जा दिसू लागला. त्याचप्रमाणे नवनवीन प्रकल्पही सुरू झाले. त्यात आरो पाणी शुद्धीकरण पद्धत, बायोमेट्रिक पद्धतीने रेशनिंग धान्य वाटप, बांधावर खातेवाटप, माध्यान्ह भोजनासाठी आग्रह, शिरपूर पॅटर्न साखळी बंधारे असे महत्वाचे प्रकल्प त्यांनी राबविले. राज्य शासनाने त्या कार्याची दखल घेतली. योजना माहिती नसल्याने तिच्या पासून वंचित असलेल्या कित्येक लोकांना राज्यातील उत्तम रुग्णालयात मोफत औषध उपचारांचा लाभ मिळवून दिला.

गरिबांना आरोग्य सुविधा मोफत मिळावी यासाठी प्रसंगी न्यायालयात गोरगरिबांची वकिली करून त्यांनी भरलेली बिले परत मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आम आदमी विमा योजनेचे अर्ज भरून घेणे अशा अनेक गोष्टींबरोबरच स्थानिक तीर्थक्षेत्रांचा विकास, स्मशानभूमीचे सुशोभीकरण कार्य त्यांनी केले आहे.

  स्थानिक तरुणांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते म्हुणुनच त्यांना रोजगार मिळण्यासाठी कॉल सेंटर्स, बीपीओ शिरूर मध्ये सुरू करण्याचे त्यांचे काही प्रकल्प आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे तसेच मुलामुलींसाठी वसतिगृह बांधले. शिरूरच्या पर्यटन स्थळांचा विकास करायचा म्हणून त्या दृष्टीने कार्य सुरू केले आहे. एसटी स्टँड अद्ययावत सुविधांनी सुसज्ज केले, वाघोली शिक्रापूर एलिव्हेटेड शिक्रापूर, शिरूर सहापदरी रस्ता बनवला, अनेक योजनांचे निधी मंजूर करवून कामे सुरू झाली.

खरोखर अशोकबापूंना विकास पुरुष म्हणल्यास वावगे ठरू नये..!