अल्मा (कॉलोराडो)
Appearance
अल्मा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव पार्क काउंटीमध्ये असून येथील लोकसंख्या २७० आहे. अल्मा ब्रेकेनरिज आणि फेरप्ले गावांच्यामध्ये कॉलोराडो ९ वर वसलेले आहे.
अल्मा ३,२२४ मीटर (१०,५७८ फूट) उंचीवर आहे. हे गाव अमेरिकेमधील कायम वस्ती असलेले सगळ्यात उंचीवरचे गाव आहे.[१] या गावाची स्थापना २ डिसेंबर, १८७३ रोजी मिस्टर जेम्स या व्यापाऱ्याने केली. त्याने या गावाला आपल्या बायको[२] किंवा मुलीचे[३] नाव दिले.
हे गाव रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेच्या पायथ्याशी असून येथून अनेक स्की रिसॉर्ट व गिरिभ्रमणमार्ग जवळ आहेत. डिकॅलिब्रॉन या १४,००० फूटांची चार शिखरे पार करणारा मार्ग येथून जवळ असलेल्या काइट लेकपासून सुरू होतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "US Board on Geographic Names". United States Geological Survey. 2007-10-25. 2008-01-31 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. pp. 22.
- ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 6.