अल्केम लॅबोरॅटोरीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्केम लॅबोरॅटोरीज लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.539523
एन.एस.ई.ALKEM
उद्योग क्षेत्र फार्मास्युटिकल्स
स्थापना १९७३
संस्थापक सम्प्रदा सिंह
मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती सम्प्रदा सिंह, धनंजय कुमार सिंह
उत्पादने फार्मास्युटिकल्स, जेनेरिक औषधे
महसूली उत्पन्न increase  १३० billion (US$२.८९ बिलियन) (२०१४ - २०१५)[१]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
increase 31.82 बिलियन (US$७०६.४ मिलियन) (२०१४ - २०१५)
निव्वळ उत्पन्न increase 11.44 बिलियन (US$२५३.९७ मिलियन) (२०१४ - २०१५)
एकूण मालमत्ता increase 41.75 बिलियन (US$९२६.८५ मिलियन) (२०१४ - २०१५)
एकूण इक्विटी increase 13.5 बिलियन (US$२९९.७ मिलियन) ((२०१४ – २०१५))
मालक सम्प्रदा सिंह
कर्मचारी १५००० (२०१५)
संकेतस्थळ www.alkemlabs.com

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड ही एक बहुराष्ट्रीय औषधनिर्माण संस्था आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. तेथे फार्मास्युटिकल जेनेरिक्स, फॉर्म्युलेशन आणि न्यूट्रस्यूटिकलची निर्मिती व विक्री केली जाते.

कंपनी[संपादन]

स.न. २००३ मध्ये तळोजा येथे अल्केमने स्वतःची संशोधन व विकास सुविधा स्थापन केली. स.न. २००६ मध्ये अल्केमचा एंटी-इन्फेक्टीव्ह ड्रग टॅक्सिम आले. हे भारतीय औषध भारतातील (देशांतर्गत) विक्रीचा १,००० दशलक्ष टप्पा ओलांडणारे पहिले अँटी-इन्फेक्टीव्ह औषध ठरले. स.न. २०१४ मध्ये अल्केमचे क्लावम हे औषध इतर देशांतर्गत विक्रीत २,००० दशलक्षांचा टप्पा ओलांडला. २००७ मध्ये कंपनीने अमलोडीपाइन या औषधासाठी पहिला एएनडीए दाखल केला जो २००९ मध्ये मंजूर झाला. अल्केमने ७०५ ब्रँडेड जेनेरिक औषधांचा एक पोर्टफोलिओ विकसित केला. यातील १३ औषधे २०१५ च्या आर्थिक वर्षात भारतातील अव्वल ३०० ब्रँडच्या यादीत समाविष्ट होत्या. अल्केमच्या एकूण २१ कारखाने आहेत, त्यातील १९ भारतात आहेत आणि २ अमेरिकेत आहेत. यापैकी ५ यूएस एफडीए, टीजीए, यूके एमएचआरए मंजूर आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Alkem Laboratories Ltd. profit and loss (P&L), financial statement, accounts". rediff.com.