अलेक्सांद्रा एल्बाक्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्सान्द्रा एल्बाक्यान

अलेक्सान्द्रा असानोव्ह्ना एल्बाक्यान (रशियन : Алекса́ндра Аса́новна Элбакя́н) ह्या एक कझाकस्तानी स्नातकोत्तर विद्यार्थिनी, संगणक प्रोगामर व भूमिगत महाजाल लुटारू कार्यकर्त्या आहेत. त्या साय-हब ह्या संकेस्थळाच्या निर्मात्या आहेत. नेचर ह्या विज्ञानासंबंधी साप्ताहिकाने विज्ञानक्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या १० लोकांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे, तर आर्झ टेक्निका ह्या संकेतस्थळाने त्यांची तुलना अ‍ॅरन स्वॉर्ट्झ ह्या महाजाल कार्यकर्त्याशी केली आहे.