अलीवालची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलीवालची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि शीख साम्राज्यामध्ये लढली गेलेली लढाई होती. २८ जानेवारी, इ.स. १८४६ रोजी झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला.

सर हॅरी स्मिथने १२,००० सैनिकांनिशी सरदार रणजोधसिंह मजिठियाच्या नेतृत्त्वाखालील २०,००० सैनिकांना सतलज नदीकाठी अलीवाल गावाजवळ हरविले.