अलीराजपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलीराजपूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छोटे शहर आहे.

अलीराजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१च्या जनगणनेनुसार २८,४९८ होती. यांत ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या.

येथे आंब्यांचा मोठा बाजार असून आसपासच्या प्रदेशातील आंब्यांची खरेदीविक्री येथे होते.

हे शहर अलीराजपूर संस्थानाची राजधानी होते. हे संस्थान ब्रिटिश भारतातील भोपावाड एजन्सीतील राज्य होते.