अलगर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलगर्द हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. हा तारकासमूह ३०० उ. अक्षांशाच्या पलीकडे हा दिसत नाही. यात एकही मोठा तारा नाही. यातील सर्वांत मोठ्या आल्फा ताऱ्‍याची प्रत तीन आहे. यमुना तथा इरिडानस या समूहातील अग्रनद (आचर्नार) या पहिल्या प्रतीच्या ताऱ्‍याच्या आग्नेयेस हा तारकासमूह असतो. या समूहाच्या पूर्वेस मोठा मॅगेलनी मेघ व मलयाचल (मेन्सा), पश्चिमेस कारंडव (तुकाना) व छोटा मॅगेलनी मेघ, उत्तरेस जालक (रेटिक्युलम) आणि दक्षिणेस अष्टक (ऑक्टन्स) असे समूह आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात दक्षिण क्षितिजाजवळ ताऱ्यांच्या नकाशाच्या मदतीने यातील आल्फा तारा पाहणे शक्य होते.