अरित्रा दत्ता
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म |
१५ ऑगस्ट, १९९१ चेन्नई, भारत |
फलंदाजीची पद्धत | उजखुरा |
भूमिका | फलंदाज |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण (कॅप १६) | २९ सप्टेंबर २०१९ वि झिम्बाब्वे |
शेवटची टी२०आ | २४ ऑगस्ट २०२२ वि कुवैत |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २४ ऑगस्ट २०२२ |
अरित्रा दत्ता (जन्म १५ ऑगस्ट १९९१) हे सिंगापूरचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] ऑक्टोबर २०१८ मध्ये, त्याला ओमानमध्ये २०१८ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन थ्री स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात स्थान देण्यात आले.[२] तो १० नोव्हेंबर २०१८ रोजी ओमानविरुद्ध सिंगापूरच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला.[३] पाच सामन्यांत २०४ धावा करून तो स्पर्धेत सिंगापूरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.[४]
सप्टेंबर २०१९ मध्ये, २०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिकेसाठी सिंगापूरच्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली.[५] २९ सप्टेंबर २०१९ रोजी सिंगापूर तिरंगी मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध सिंगापूरसाठी त्याने टी२०आ पदार्पण केले.[६] ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात स्थान देण्यात आले.[७]
ऑक्टोबर २०२३ मध्ये, दत्ता यांची २०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सिंगापूरचा कर्णधार म्हणून निवड झाली.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
[संपादन]- ^ "Aritra Dutta". ESPN Cricinfo. 9 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "Squads and match schedule announced for ICC World Cricket League Division 3". International Cricket Council. 31 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "4th Match, ICC World Cricket League Division Three at Al Amarat, Nov 10 2018". ESPN Cricinfo. 10 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "ICC World Cricket League Division Three, 2018/19 - Singapore: Batting and bowling averages". ESPN Cricinfo. 19 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "INSTAREM tri-series Singapore 2019-20 – Fixtures, Schedule, Venues, Squads, Match Timings and Live Streaming Details". CricTracker. 26 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "3rd Match (N), Singapore Twenty20 Tri-Series at Singapore, Sep 29 2019". ESPN Cricinfo. 29 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "ICC T20 World Cup Qualifier – UAE". Cricket Singapore. 10 October 2019 रोजी पाहिले.