अरविंद गोडबोले
अरविंद सदाशिव गोडबोले (जन्मदिनांक अज्ञात - मृत्युदिनांक अज्ञात) हे मराठी डॉक्टर व मराठी, इंग्लिश भाषांत ललितेतर साहित्य लिहिलेले लेखक होते.
जीवन
[संपादन]गोडबोल्यांनी एम.डी.च्या परीक्षेत दोन सुवर्णपदके मिळविल्यानंतर स्कॉटलंडमधील एडिंबरा येथून एफ.आर.सी.पी आणि ग्लासगो येथून एफ.आर.एफ.पी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले. परदेशातील शिक्षण संपवून ते मायदेशी परतले व मुंबईत वैद्यकी करू लागले. मधुमेहतज्ज्ञम्हणून त्यांनी ख्याती मिळविली. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे मानसेवी मधुमेहतज्ज्ञ म्हणूनही काम केले[ संदर्भ हवा ].
साहित्यिक पैलू
[संपादन]गोडबोल्यांनी मधुमेह, वृद्ध आणि त्यांचे प्रश्न, औषधे आणि आपण, आरोग्य आणि समाज, जास्ती चांगले जगा, आहार: मधुमेह आणि स्थूलपणा इत्यादी आरोग्यविषयक ग्रंथ लिहिले. आरोग्य व वैद्यकी याविषयांशिवाय त्यांनी सावरकर विचारदर्शन, गुरू नानक ते गुरू गोविंदसिंग हे ग्रंथही लिहिले. डायबिटिस मेलिटस फॉर प्रॅक्टिशनर्स, फुल लाइफ विथ डायबिटिस आणि फिलॉसॉफी ऑफ श्री गुरू ग्रंथ साहिबजी असे त्यांनी लिहिलेले इंग्लिश भाषेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांचे हिंदीत अनुवादही झाले आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |