अमीर खुस्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमीर खुसरो या पानावरून पुनर्निर्देशित)
अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो

अमीर खुसरो
आयुष्य
जन्म इ.स. १२५३
जन्म स्थान पतियाळा, मुघल साम्राज्य
मृत्यू इ.स. १३२५
मृत्यू स्थान दिल्ली, मुघल साम्राज्य
व्यक्तिगत माहिती
धर्म मुस्लिम
देश मुघल साम्राज्य
भाषा हिंदी भाषा, उर्दू, फारसी
पारिवारिक माहिती
वडील सैफुद्दीन शामसी उत्तरी
संगीत साधना
गुरू निझामुद्दीन ओलिया
गायन प्रकार कव्वाली, गजल
संगीत कारकीर्द
पेशा संगीतकार, कवी
विशेष कार्य खामसा-ए-निझामी

अमीर खुसरो दहेलवी (१२५३-१३२५ इ.स.), (पर्शियन: ابوالحسن یمین‌الدین خسرو, (किंवा अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो) , (उर्दुः امیر خسرو دہلوی), इ.स. १२५३-१३२५ च्या काळातील कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ होते. खुसरो आध्यात्मिक गुरू व सूफी संत हजरत निझामुद्दीन ओलियाना यांचे शिष्य होत. उत्तर भारतीय अभिजात संगीतातील खयाल रचना निर्मितेचे श्रेय खुसरोंकडे जाते. त्यांनी ध्रुपद संगीतात सुधार करून त्यात इराणी धून व ताल वापरून ख्यालगायकीची रचना केली. खुसरो यांनी भजनरूपांतील रचनाही तयार केल्या आहेत. ते फारसी व हिन्दवीत (हिंदीचे एक रूप) कविता लिहीत असत. त्यांनी हिंदीउर्दू भाषांमध्येही लिखाण केले आहे. त्यांना अरबी भाषेचेही ज्ञान होते. त्यांच्या बहुतांश रचना आजही हिन्दुस्तानी अभिजात संगीतात बंदिश रूपात वापरल्या जातात व त्यांच्या गझला आजही गायल्या जातात.

ते उर्दू भाषेतील पहिले कवी आहेत. त्यांना कवालीचे जनक म्हटले जाते. कव्वाली म्हणजे भारतीय सुफी पंथीयांचे भक्तिसंगीत होय. त्यांनी अभिजात संगीतातील तराणा निर्मिती व प्रारंभिक रागांची संगीत बांधणी केली. तबल्याचे जनकत्वही त्यांच्याकडे जाते. संगीताखेरीज ते मल्लविद्येत व घोडेस्वारीतही पारंगत होते.

खुसरो दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी, गयासुद्दीन तुघलक यांसारख्या सात सुलतानाच्या दरबारातील जाणते संगीतकार होते.खुसरो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. त्यांचे पिता सैफुद्दीन शामसी उत्तरी अफगाणिस्तान मधील बल्ख येथे फारसी लष्करी धिकारी होते. माता मूळ उत्तर प्रदेशची राजपूत होती. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

सुलतान जलालुद्दीन खिलजीने अमीर खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्याला अमीर हा किताब दिला.

खुसरो यांच्या रचना[संपादन]

विकिस्रोत
विकिस्रोत
अमीर खुस्रो हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
अमीर खुसरो रचित खामसा-ए-निझामी मधील चित्र

पर्शियन


  • اگر فردوس بر روی زمین است

همین است و همین است و همین است

अगर फिरदौस बर रूए झमीं अस्त
हमीं अस्तो,हमीं अस्तो,हमीं अस्त.

(जर कोठे स्वर्ग असेल तर तो येथेच आहे, येथेच आहे येथेच आहे )

हिंदी

  • ख़ुसरो दरिया प्रेम का, उलटी वा की धार,
जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार.
  • सेज वो सूनी देख के रोवुॅं मैं दिन रैन,
पिया पिया मैं करत हूॅं पहरों, पल भर सुख ना चैन.

अमीर खुसरो यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]