Jump to content

अभिजीत देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अभिजित देशपांडे (संकलक) या पानावरून पुनर्निर्देशित)

अभिजित देशपांडे हे एक चित्रपट संकलक (एडिटर) आहेत. हे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट संकलन शिकले.

स्वयंपाक आणि एडिटिंग

[संपादन]

एडिटिंग शिकत असतानाही अभिजित देशपांडे यांच्यातली स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांची आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. शुभाताईंच्या त्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ शिकवायला व शुभाताईंबरोबर पुण्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथले खास पदार्थ मागवून ते कसे केले असतील ते लिहून काढायला त्यांनी सुरुवात केली. शेफचे कामाचे तास संपेपर्यंत स्टाफ गेटपाशी वाट पाहून ते शेफकडून पाककृती घ्यायचे आणि प्रयोग करायचे.

शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बऱ्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसऱ्या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यांना सवय लागली.

मुळात आवडीने ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केलेले देशपांडे Indian Magic Eye Motion Pictures (IME) या संस्थेमध्ये सिनेएडिटर असलेल्या मोहन टाकळकर या मित्राच्या सांगण्यावरून IMEमध्ये काम करू लागले. तीन वर्षे तेथे काम केल्यावर ते.

पॅरिसमधले शिक्षण

[संपादन]

अभिजित देशपांडे यांना २००६मध्ये, डॉक्युमेंटरी सिनेमा शिकायला पॅरिसला जायची स्कॉलरशिप मिळाली. आधुनिक चित्रपट आणि आधुनिक पाककला या दोन्हीचेही माहेरघर असणाऱ्या पॅरिसमध्ये ज्यांची फक्त नावे वाचली होती ते पदार्थ इथे रस्त्यावर मिळत होते. आठवड्यातील तीन दिवस अभिजित देशपांडे यांच्या खोलीमध्ये पार्टी असायची. ११ वेगवेगळ्या देशांतून आलेल्या ११ जणांचा वर्गमित्रपरिवर या पार्टीत सामील असायचा. देशपांडे यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये ते आईने दिलेली लसूण चटणी वापरायचे. या क्लासमेट्सनी त्याला L’ épice magical असे नाव दिले होते. मेक्सिकन गाजपाचो, मोरॉक्कन, कुस् कुस्, व्हिएटनामियन् नूडल्स.. सगळ्यात L’ épice magical वापरून अभिजित देशपांडे यांनी अनेक मित्रमैत्रिणी जोडल्या.

अभिजित देशपांडे यांनी संकलन केलेले चित्रपट

[संपादन]

लग्न झाल्यानंतरही देशपांडे स्वयंपाकघरापासून लांब गेले नाहीत. पत्‍नी स्मित आठ वाजता कामाला गेली की रात्री आठ वाजेपर्यंत घरी कोणीच नसायचे. अभिजित यांचे दिग्दर्शक मित्र घरी यायचे आणि ते पूर्ण स्वयंपाक करत रोज एडिटिंग करायचे. ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण स्वयंपाकघरातच झाले.

उमेश कुलकर्णीबरोबर खातखात आणि खाण्यावर चर्चा करत ‘देऊळ’चं एडिटिंग झाले. त्यानंतर सचिन कुंडलकरच्या ‘राजवाडे अँड सन्स’चे.