अबुल फैजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अबुल फैजी (२४ सप्टेंबर, इ.स. १५४७ - ५ ऑक्टोबर, इ.स. १५९५[१]) हा सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. अकबराच्या दरबारात राजकवी म्हणूनही त्याने काम केले. याच्या वडिलाचे नाव शेख मुबारक असे होते. अकबराने अबुलला दरबाराच्या वतीने शिक्षक म्हणून नेमणूक दिली. अकबराने बुरहानपूर येथे दरबाराचा वकील म्हणूनही त्याची नेमणूक केली होती. कविराज या अर्थाचा मलिक-उश-शुअरा हा किताब त्याला देण्यात आला होता.

लेखन[संपादन]

अबुल फैजीने सम्राटाच्या आग्रहावरून नल-दमयंती आख्यानावर फारसीत महाकाव्य रचले. महाभारताचा फारसी अनुवादही केला. भास्कराचार्याच्या बीजगणित व लीलावती या ग्रंथांची फारसीत भाषांतरे केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ फ्रान्सिस्का ओर्सिनी. लव्ह इन साऊथ एशिया: अ कल्चरल हिस्ट्री. p. ११२. ISBN 0-521-85678-7.