अप्पासाहेब धर्माधिकारी
अप्पासाहेब धर्माधिकारी | |
---|---|
जन्म |
दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी १४ मे १९५१ |
निवासस्थान | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | अप्पासाहेब |
नागरिकत्व | भारत |
पेशा | समाजसेवक |
धर्म | हिंदू |
अप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. २०१४ मध्ये डाॅ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले.[१] २०१७ मध्ये, ते चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित झाले.[२]
संदर्भ[संपादन]
- ^ "समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी मानद पदवीने सन्मानित". दैनंदिन बातम्या व विश्लेषण. ४ एप्रिल २०१४. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "'पद्मश्री' सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा: आप्पासाहेब धर्माधिकारी". लोकसत्ता. २५ जानेवारी २०१७. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.