अपरांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अपरांत या शब्दाचा अर्थ मोक्षाच्या नंतरची स्थिती.


अर्थ[संपादन]

"अपर्" याचा एक अर्थ उच्च असा होतो, आणि म्हणून उच्च असा "अंत" म्हणजेच अपरांत. आज आपण भारतातील पश्चिम किनाय्रा लगतच्या भागास कोकण किनार पट्टी म्हणतो त्यास बौद्ध काळा पूर्वी् अपरांत भूमी (अपरांतक भूमी) म्हणत असत. या अपरांत भूमी राजधानी होती सुर्पारक(पालि भाषेत'सुप्पारक') ज्यास आपण सध्या नालासोपारा या नावाने ओळखतो. ही मुळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी.

ऐतिहासिक संदर्भ[संपादन]

भागवतात भगवान श्रीविष्णु यांनी परशुराम अवतार घेऊन निर्माण केलेली भूमी असा उल्लेख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदीर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदीर आहे. आजही या ठिकाणी परशुरामांच अस्तित्व आहे अस मानल जात.

अजून एक संदर्भ म्हणजे नालासोपारा या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे भिक्षापात्र आहे. नालासोपारा येथे अनेक बौद्ध कालीन लेणी आणि सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप आहे.