चर्चा:अनुराधापुऱ्याचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दक्षिणी भारतीय आणि सिंहली भाषांतील अकारान्त शब्दाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये शेवटी a येतो. त्याचा उच्चार कान्यासारखा करायचा नसतो. त्यामुळे Anuradhapura हा शब्द मराठीत अनुराधापूर असा आणि उत्तरी भारतीय भाषांनुसार अनुराधापुर असा लिहितात. कुठल्याही मराठी नकाशापुस्तकात अनुराधापूर असेच सापडेल. त्यामुळे लेखाचे नाव "अनुराधापूरचे राज्य" असे हवे होते. ’पूर’ शब्दा्ने अंत झालेल्या ग्रामनाम असलेल्या शब्दाचे षष्ठीच्या प्रत्ययापूर्वी सामान्यरूप होत नाही. नागपूरचे, सोलापूरचे वगैरे. इतर प्रत्यय लावताना नागपूरला/*पुराला, *पूरहून/पुरापासून अशी दोन्ही रूपे होतात. गाव जर भारताबाहेरचे असेल तर सामान्यरूप अजिबात होत नाही. लंडनला/लंडनचे , रशियाला, झिंबाम्वेचे, सान जोझेला वगैरे. अनुराधापूर भारताच्या बाहेरचे आहे, म्हणून प्रत्ययापूर्वी सामान्यरूप करायचे नाही.