Jump to content

अदिदास जबुलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अदिदास जबुलानी हा आदिदास या कंपनीने तयार केलेला एक फुटबॉल चेंडू आहे. हा चेंडू २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[]

या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जबुलानी: २०१० विश्वचषक चेंडू, द न्यू यॉर्क टाइम्स, ४ डिसेंबर२००९
  2. ^ जबुलानी, एल पैस, १९ डिसेंबर २००९.