अदिती अशोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अदिती अशोक (२९ मार्च, १९९८ -) ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे. तिने २०१६ च्या उन्हाळी ऑलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती. या स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यात ती पहिल्या १० मध्ये होती. दुसऱ्या टप्प्यात ती एकदा पहिल्या स्थानावर होती. पण तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात तिने चांगली कामगिरी केली नाही आणि २९१ गुणांसह ४१ व्या स्थानावर पोहोचली.

कामगिरी[संपादन]

२०११:- उन्हाळी कर्नाटक ज्युनिअर, दक्षिण इंडिया ज्युनियर, फाल्डो मालिका आशिया - भारत, ईस्ट इंडिया टॉली लेडीज, ऑल इंडिया चॅम्पियनशिप २०१२:- यूएचएचए दिल्ली लेडीज, यूएसएचए आर्मी चॅम्पियनशिप, ऑल इंडिया ज्युनियर २०१३:- आशिया पॅसिफिक ज्युनियर चॅम्पियनशिप २०१३:- ईस्टर्न इंडिया लेडीज ॲमेच्यूर, यूएसएचए इगू ऑल इंडिया लेडीज अँड गर्ल्स चॅम्पियनशिप २०१४:- सेना लेडीज आणि कनिष्ठ चॅम्पियनशिप, सेंट रुल ट्रॉफी, साउथर्न इंडिया लेडीज आणि ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिप, महिलांमध्ये ब्रिटीश ओपन एएमयू स्ट्रोक प्ले चॅम्पियनशिप, थायलंड एमेच्योर ओपन


2016 मध्ये जगभरातील 114 महिला गोल्फर्सची लेडीज युरोपियन टूर ही स्पर्धा भरली होती, त्याचे जेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय  गोल्फपटू  ठरली. विशेष म्हणजे, व्यावसायिकरीत्या गोल्फ खेळण्याचे ते अदितीचेही हे पहिलेच वर्ष होते. [1]

2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अदिती भारताची एकमेव गोल्फपटू  होती, त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षीच तिने भारतीय क्रीडा क्षेत्रात आपले नाव कोरले. [3]

भारतीय महिलांचा व्यावसायिक गोल्फमध्ये प्रवेश हा उशिरा म्हणजेच 2006 मध्ये झाला. ज्यावेळी दिल्ली येथे महिलांसाठी पहिल्या व्यावसायिक गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. [1] .[1]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

अदितीचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फचे आकर्षण असलेली अदिती कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या हिरव्यागार  गोल्फ कोर्सवर सराव करत असे. आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ  कोर्सवर जात[2] , जिथे ती लवकरच गोल्फमध्ये कुशल झाली.

अदितीचे वडील पंडित गुडलामानी अशोक हेच तिचे कॅडी आहेत.[4]

एकीकडे फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण आणि दुसरीकडे गोल्फ कोर्सवर सराव, अशी दुहेरी कसरत अदिती करत होती. पुढे ती स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.

आपले आईवडील आपला सर्वात मोठा आधार आहेत, त्यांचाच आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे, असे अदिती सांगते. तिला लेपल पिन गोळा करण्याचा छंद आहे. [6] सीव्ह बॅलेस्टेरोस तिचा आवडता गोल्फर आहे, आणि सेंट अँड्र्यूज येथील ओल्ड कोर्स तिला सर्वात जास्त आवडतो.[4]

व्यावसायिक यश[संपादन]

2011 मध्ये 13 वर्षांची असताना अदितीने कर्नाटक ज्युनियर आणि दक्षिण भारतीय ज्युनियर या दोन चॅम्पियनशिपमध्ये पहिली राज्यस्तरीय जेतेपदे पटकावली. याच वर्षी तिने राष्ट्रीय हौशी गोल्फ स्पर्धा जिंकली.

पुढच्या तीन वर्षात - 2012, 2013 आणि 2014 मध्ये तिने राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा जिंकल्या. 2014 मध्ये तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्पर्धांची जेतेपदे पटकावली. 2013 मध्ये झालेले एशियन युथ गेम्स, 2014च्या युथ ऑलिम्पिक आणि 2014च्या आशियाई खेळांमध्ये खेळणारी ती एकमेव भारतीय गोल्फर ठरली.

आपल्या प्रभावी हौशी कारकीर्दीच्या शिखरावर असताना 2015 मध्ये अदितीने लेडीज ब्रिटिश हौशी स्ट्रोक प्ले चँपियनशिपचे  अजिंक्यपद पटकावले. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून तिने व्यावसायिक गोल्फपटू म्हणून खेळण्यास सुरुवात केली.

ऑगस्ट 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळली, त्यावेळी अदिती फक्त 18 वर्षांची होती. हा एक विक्रमच ठरला, कारण ती तेव्हा ऑलिम्पिकमध्ये गोल्फ खेळणारी सर्वात तरुण स्पर्धक (पुरुष किंवा महिला) होती, शिवाय ऑलिम्पिकमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू होती. [1][3]

त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये अदितीने पहिल्यांदा लेडीज युरोपियन टूर (LET) जिंकली. हा विजय तिची होम टूर्नामेंट असलेल्या वुमेन्स इंडियन ओपन स्पर्धेत तिला मिळाला होता. [3]

त्यानंतर अदितीने कतार लेडीज ओपन स्पर्धाही जिंकली आणि तिला ‘एलईटी रूकी ऑफ द ईअर' हा पुरस्कार देण्यात आला. 2017च्या गाजलेल्या अमेरिकन दौऱ्यामध्ये LPGA (द लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन) टूर कार्ड मिळविणारी ती पहिली भारतीय ठरली. [5]

अदितीने 2018 मध्ये 24 आणि 2019 मध्ये 22 स्पर्धा खेळल्या. यात दोन वेळा ती पहिल्या दहामध्ये होती, ज्यापैकी एक व्होलंटिअर्स ऑफ अमेरिका LPGA टेक्सास क्लासिक ही स्पर्धा होती. [6]

संदर्भ[संपादन]

18 की उम्र में कामयाबी जिसके कदम चूमती है [१]

Aditi Ashok profile-women’s golf [२]

Aditi ASHOK- Olympicchannel [३]

Olympics 2016: 5 Things To Know About Indian Golfer Aditi Ashok [४]

https://www.olympicchannel.com/en/stories/features/detail/india-golf-top-women-aditi-ashok-sharmila-nicollet-diksha-dagar-tvesa-malik/ [५]

https://www.lpga.com/players/aditi-ashok/98652/bio [६]

Details in Box

वैयक्तिक माहिती[संपादन]

जन्मतारीख : 29 मार्च 1998

जन्मस्थळ : बंगळुरू

उंची: 1.73 मीटर (5 फूट 8 इंच)

राष्ट्रीयत्व: भारतीय

कारकीर्द[संपादन]

व्यावसायिक खेळाडू 2016 पासून

सध्याच्या टूर्स:

लेडिज युरोपियन टूर

LPGA टूर

व्यावसायिक जेतेपदे: 5

टूरनिहाय विजयांची संख्या

लेडिज युरोपियन टूर : 3

इतर : 2

मानांकने आणि पुरस्कार

LET रूकी ऑफ द ईअर 2016

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ris, M. M.; Deitrich, R. A.; Von Wartburg, J. P. (1975-10-15). "Inhibition of aldehyde reductase isoenzymes in human and rat brain". Biochemical Pharmacology. 24 (20): 1865–1869. doi:10.1016/0006-2952(75)90405-0. ISSN 0006-2952. PMID 18.
  2. ^ Mitra, Aditi (2013-03). "Book review". Women's Studies International Forum. 37: 129–130. doi:10.1016/j.wsif.2012.10.003. ISSN 0277-5395. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Aditi ASHOK- Olympicchannel (3)
  4. ^ Olympics 2016: 5 Things To Know About Indian Golfer Aditi Ashok (4)
  5. ^ (5) https://www.olympicchannel.com/en/stories/features/detail/india-golf-top-women-aditi-ashok-sharmila-nicollet-diksha-dagar-tvesa-malik/ (5) Check |url= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ (6) https://www.lpga.com/players/aditi-ashok/98652/bio (6) Check |url= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)