अणुवस्तुमानांक
Jump to navigation
Jump to search
अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या मूलभूत कणांच्या एकत्रित संख्येला आण्विक वस्तुमान संख्या किंवा अणुवस्तुमानांक (A) असे म्हणतात. त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. एका मूलद्रव्याच्या प्रत्येक समस्थानिकाला वेगळी आण्विक वस्तुमान संख्या असते. प्रत्येक मूलद्रव्याचा अणुक्रमांक (Z), म्हणजे प्रोटॉनची संख्या. ही मूलद्रव्याची अचूक ओळख मानली जाते. हिच्यापासून अणुवस्तुमानांक ही संख्या भिन्न असते. अणुवस्तुमानांक = अणुक्रमांक + न्यूट्रॉनची संख्या (A = Z + N ).
समस्थानिके ( Isotopes )[संपादन]
एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकरूप असतातच असे नाही. त्यांच्या अणुवस्तुमानांमध्ये फरक आढळतो. अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात. एकाच मूलद्रव्यांच्या भिन्न अणूंचा अणुक्रमांक एकच असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात.
- एख्याद्या मूलद्रव्याची अण्विक वस्तुमान संख्या आणि अणुक्रमांक यांच्यातील फरक म्हणजेचं त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रातील न्यूट्रॉनची संख्या: N = A - Z.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]