अईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अईन वृक्ष

आईन किंवा अईन हा भारतात उगवणारा एक आयुर्वेदिक औषधी वृक्ष आहे.याचे मूळ स्थान भारताच्या दक्षिण व दक्षिण पुर्वोत्तर भागात आहे.तसेच हा नेपाळ,बांगलादेश ,म्यानमार ,थायलंड,कंबोडियाव्हियेतनाम येथेही आढळतो.

ह्याला भारतीय भाषांत खालील विविध नावे आहेत.

इंग्रजी - Indian Laurel लॅटिन - Terminalia elliptica वा Terminalia alata वा Terminalia tomentosa

हे सुमारे ३० मी. (१०० फूट ) उंच वाढणारे झाड आहे. याची गोलाई सुमारे १ मी. इतकी असू शकते.याचे फळास पाच पंख असतात व ते सुमारे ३ सेंमी. असते. ते साधारणतः अंडाकृती असते.[१]याचे लाकूड हे अग्नीरोधी व खडबडीत असते.यास कोणतीही चव अथवा वास असत नाही.याचा गाभा हा कथ्थ्या अथवा काळसर कथ्थ्या रंगाचा असतो. याला वाळवी लागल्यास त्याची भूकटी होते.[२]

"आईन" ची उल्लेखनीय विशेषता अशी आहे:या प्रजातीतील काही सदस्य कोरड्या हंगामात पाणी साठवतात. भारतातील बांदीपूर राष्ट्रीय उद्यान येथे आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार,ही झाडेत्याच्या खोडाच्या अनुपातात एका विशिष्ट प्रमाणात पाणी साठवतात त्याची वारंवारता व पाणी साठविण्याचे प्रमाणा एका विशिष्ट परिस्थीतीत वाढते. या जल संग्रहणाची यंत्रणा आणि पारिस्थितिकीय महत्त्व अद्याप ज्ञात झाले नाही.[३]

वापर[संपादन]

याचे लाकूड फर्निचर, कपाटे, नाव व फळ्या आदींसाठी वापरले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Flora of China: Terminalia
  2. ^ लाकडाबद्दल तांत्रिक तथ्थ्य : Terminalia tomentosa complex Archived 2007-03-17 at the Wayback Machine.
  3. ^ करंट सायन्स, "Water Storage in Terminalia tomentosa"

हे सुद्धा पहा[संपादन]