पोयसर नदी
Appearance
पोयसर नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कच्या बोरीवली बाजूच्या टोकाला हिचा उगम आहे. कांदिवली या उपनगरातून वहात वहात ती वरसोवा (वेसावे) खाडीला मिळते. कांदिवलीमधे एका चर्चला पोयसर चर्च म्हणतात. या नदीवर बांधलेला एक पूल कांदिवली आणि बोरीवलीची सरहद्द आहे.
पोयसर हा पश्चिम कांदिवली उपनगराचा एक भाग आहे. या भागात पोयसर बस डेपो आणि पोयसर टेलिफोन ए्क्सचेंज आहे.