गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन
नागपूर येथे पहिले राज्यव्यापी एकदिवसीय संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन रविवार, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी शिक्षक बँक सभागृहात झाले. संमेलनाचे उद्घाटन प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी यावेळी डॉ. विठ्ठल वाघ (संमेलनाध्यक्ष), डॉ.नितीन राऊत, ना. राजेंद्र मुळक, डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अक्षयकुमार काळे व स्वागताध्यक्ष बालाजी शिदे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथपालखीचा शुभारंभ महापौर अनिल सोले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगरसेविका हर्षदा सावळे व अर्चना डेहनकर उपस्थित होत्या.
या संमेलनात गाडगेबाबांची कीर्तनशैली व गाडगेबाबांचा प्रबोधनविचार या दोन विषयावर परिसंवाद झाले.
२रे संमेलन
[संपादन]२रे संत गाडगेबाबा साहित्य संमेलन नाशिकमध्ये २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाले. चित्रपट दिग्दर्शक राजदत्त या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या संमेलनात ’संतांच्या मांदियाळीत गाडगेबाबा’ हा परिसंवाद झाला. त्यात डॉ. सदानंद मोरे, प्रा. अभय टिळक, डॉ. दिलीप धोंडगे यांचा सहभाग होता. परिसंवादाच्या २ऱ्या सत्राचा विषय ’महाराष्ट्रातील समाज सुधारक व गाडगेबाबा” हा होता. यात डॉ. द.ता. भोसले, डॉ. मधुकर वाकोडे, श्री. बाबासाहेब परीट यांचा सहभाग होता. तिसऱ्या सत्रात ’अंधश्रद्धा निर्मूलन व गाडगेबाबांचे कीर्तन हा विषय होता. यात श्याम मानव, महेंद्र दातरंगे, विलास देशमुख, सचिन पवार यांनी भाग घेतला.