मराठी विकिपीडियावर योगदान देण्याच्या आपल्या प्रयत्नांचे स्वागत आहे. पाच पेक्षा अधिक, अत्यल्प मजकुर पानांची निर्मीती थोड्या कालावधीत आपल्याकडून झाली असण्याची शक्यता स्वयमेव संपादन गाळणीने नोंदविली आहे. मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन संकेतांना/धोरणांना अनुसरून नवीन अल्पमजकुर अथवा रिकाम्या पांनाची निर्मिती शक्यतो टाळावी असा अलिकडील संकेत आहे.
या संपादन गाळणीसाठी साधारणत: दोन परिच्छेद (म्हणजे ४००० बाईट्स) पेक्षा कमी मजकुर असलेली लेख निर्मिती अत्यल्प मजकुर पाने म्हणून गणली जाते. पुरेसा आणि सुयोग्य विश्वकोशीय मजकुर लिहिल्याची खात्री करून हे पान आपण पुन्हा जतन करावे हि नम्र विनंती.
हे धोरण नवीन सदस्य (नवीन सदस्यांनी लिहिण्यात पुढाकार घेऊन पहाणे अधीक महत्वाच आहे) तसेच महाराष्ट्र व मराठी भाषेच्या संदर्भाने असलेल्या लेखांकरीता अधिक लवचीक आहे.
अत्यल्प मजकुर अथवा रिकाम्या लेखांची स्वनिर्मिती टाळणे हि जबाबदारी खास करून अनुभवी आणि जाणत्या सदस्यांची आहे.
भविष्यातील लेखनाच्या दृष्टीने शीर्षके त्रोटक माहिती सहित नोंदवून ठेवायची असल्यास मुख्य लेख विषयाच्या चर्चा पानावर अथवा प्रकल्प पानावर नोंदवून ठेवल्यास इतर सदस्यही आपली माहिती भविष्यात वापरू शकतील आणि अत्यल्प मजकुर पानांच्या निर्मीतीचा मराठी विकिपीडियावरील ताण कमी होण्यास साहाय्य होईल.
मराठी विकिपीडियावर आरंभीच्या उत्साहाच्या काळात जाणत्या संपादकांकडून नवीन लोक येतील आणि माहिती भरतील या आशेने मोठ्या प्रमाणावर अत्यल्प मजकुर आणि रिकाम्या पानांची निर्मिती झाली; प्रत्यक्षात काळ-काम-वेग, संपादकांची संख्या आणि मजकुर भरावयाच्या अत्यल्प व रिकाम्या पानांची संख्या याचे गुणोत्तर न जमल्यामुळे मोठा बॅकलॉग निर्माण झाला. अधिक शीर्षके असल्याने गूगल इत्यादी वरून वाचक आकृष्ट होणे सोपे होत असले तरी मोठ्या प्रमाणावर रिकामी पाने असल्याने तर गूगल वरून माहिती शोधत येणाऱ्या वाचकांचा हिरमोड होऊन वाचकांचा लेखन आणि संपादनात जसा सहभाग वाढण्यास खीळ बसू लागली. त्यामुळे वाचक आकृष्ट होण्या पुरते अत्यल्प मजकुरांच्या पानांची सुद्धा गरज भासते पण ती उत्साही नवागत सदस्यांकडून तशीही पूर्ण होते. तेव्हा समतोल साधण्याच्या दृष्टीने या संपादन गाळणीची योजना केली गेली. म्हणजे उत्साहाच्या भरात अल्प कालावधीत ५ पेक्षा अधीक अत्यल्प मजकुराची संपादने झाल्यास हि संपादन गाळणी सदस्यांचे लक्ष वेधते.
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:संगा ५१ सजगता संदेश अथवा येथे सुचवावेत अथवा .
सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे.
आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.