मुलाणी
Appearance
मुलाणी हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे असे काही ठिकाणी वाचनात येते, तर काही ठिकाणी मुलाणी किंवा मुलाणा हा अलुतेदार असल्याचे सांगितले जाते. मुलाणीऐवजी कोळी हे नाव कुठेकुठे बकुतेदारांच्या यादीत असते. प्रत्येक गावात जर मासेखाऊ लोक नसतील तर तेथे कोळी असायचे कारण नाही, त्यामुळे मुलाणी हाच बारा बलुतेदारांपैकी एक असावा.
गुरव आणि मुलाणी हे तिसऱ्या क्रमांकाचे बलुतेदार समजले जातात. मुलाण्याकडे केवळ बकरू मारायचे काम असायचे. खळे सुरू करताना शेतकऱ्यांचे श्रमभोजन(इर्जिक) असायचे, अशा इर्जिकीच्या वेळी बकरू मारले जायचे. याशिवाय, देवाचा नवस फेडायच्या वेळी बकरू बळी देताना मुलाण्याची गरज पडत असे. हरीण डुक्कर वगैरेंची शिकार करून, त्यांना कापण्याचे काम क्षत्रिय करीत. बकऱ्यासाठी मात्र मुलाणीच लागे. मुलाणी धर्माने बहुधा मुसलमान असत.