इंदूर संस्थान
Appearance
इंदूर संस्थान इंदौर संस्थान | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: प्राहोमेशोलभ्या श्रीः कर्तुः प्रारब्धान् | ||||
राजधानी | इंदूर | |||
सर्वात मोठे शहर | इंदूर | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: मल्हारराव होळकर (प्रथम)(इ.स. १७३१-१७६६) अंतिम राजा: यशवंतराव होळकर (द्वितीय) (इ.स. १९२६-१९४८) |
|||
इतर भाषा | मराठी, हिंदी | |||
लोकसंख्या | 1,325,089 (१९३१) | |||
–घनता | 53.9 प्रती चौरस किमी |
इंदूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील सेन्ट्रल इंडिया एजन्सी मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाला होळकर संस्थान असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.
क्षेत्रफळ
[संपादन]इंदूर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.
राजधानी
[संपादन]या संस्थानाची राजधानी इंदूर या नगरात होती.
स्थापना
[संपादन]इंदूर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.
स्वातंत्र्योत्तर काळ
[संपादन]इंदूर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.