गणपती वासुदेव बेहेरे
गणपती वासुदेव बेहेरे (सप्टेंबर १९, इ.स. १९२२ - मार्च ३०, इ.स. १९८९) हे मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत.
ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे, वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई होते. रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे.
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती.
ग.वा. बेहेरे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अंकुर (कादंबरी)
- अखेरचा प्रयोग
- अक्षरयात्रा (ललितलेख)
- आडवाट (कादंबरी)
- आंतरयात्रा
- आनंदयात्रा (आत्मचरित्र)
- उतरंड (कादंबरी)
- ओली आठवण (कथासंग्रह)
- कटाक्ष (ललित लेख)
- गवाक्ष (ललित लेख)
- चकोरी
- जळणं थोडं बाकी आहे
- झुंज (कादंबरी)
- त्रैराशिक (कथासंग्रह)
- दिशाहीन (कादंबरी)
- निसर्गयात्रा (ललित लेख)
- प्रचंड (कादंबरी)
- प्रतिबिंब (कादंबरी)
- मेकअप (कादंबरी)
- मोरपिसारा (विविध)
- रक्तबीज (कादंबरी)
- रंगढंग (लघुकथा)
- वाकडी वळणे (लघुकथा)
- वाट वेगळी (कादंबरी)
- संसारयात्रा (चरित्र)
- संसार संगीत (संकीर्ण लेख, सहलेखक अ.दि. कोकड)
- सुख सामोरी (लघुकथा)
- सुरांची वाट (कादंबरी)
- सोबतचे पहिले पान (राजकीय, -४ खंड : अनुक्रमे सत्ता, संघर्ष, राष्ट्रवाद आणि रचना).
- स्मरण (मृत्युलेखसंग्रह)
- हवलेले पुणे (लेखसंग्रह)
- हसरे रुदन (कथासंग्रह)
- हार आणि प्रहार (लेखसंग्रह)