शांतादुर्गा
शांतादुर्गा ही गोवा येथे असलेली देवी आहे.हिचे मंदिर गोव्याच्या कवळे गांवात आहे.
आख्यायिका
[संपादन]विष्णू व शिव यांचे एकदा युद्ध झाले.ते थांबत नव्हते म्हणून ब्रम्हदेवाने दुर्गेला बोलावून त्यांना शांत करण्याची विनंती केली.दुर्गा देवीने त्यांना शांत केले म्हणून देवीचे 'शांतादुर्गा' हे नाव पडले.
इतिहास
[संपादन]त्रिहोत्रीपूरहून ही देवता सारस्वत ऋषीच्या वंशजांनी गोव्यात आणली.या देवतेचे मूळ मंदिर केळोशी या गावात होते.सन १५६६ नध्ये ते उद्धस्त केल्या गेले.[ संदर्भ हवा ]ती मूर्ती मग कवळे येथे आणण्यात आली.तेथे मातीचे मंदिर बांधण्यात आले.छत्रपती शाहूमहाराजांचा(छ.शिवाजी-२) कार्यकाळात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
वर्णन
[संपादन]हे मंदिर जमिनीपासून उंच ठिकाणी वसलेले आहे.येथे दीपमाळ व नगारखाना आहे.या मंदिराचे छत कौलारू आहे.याचा कळस सोन्याचा असून दरवाजा दुतर्फा चांदीने मढविलेला आहे.शांतादुर्गेची मूर्ती शिव व विष्णू यांचे मूर्तीमध्ये आहे.कौशिक,भारद्वाज वत्सइत्यादी गोत्रांच्या लोकांचे हे दैवत आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-छोटे उस्ताद पुरवणी,पान क्र.४,दि. २३/११/२०१३ मथळा: गोव्याची कुलस्वामिनी शांता दुर्गा दि. २३/११/२०१३ रोजी ०९.५६ वाजता जसे दिसले तसे.
बाह्यदुवे
[संपादन]- शांतादुर्गा देवीस अर्पित केलेले संकेतस्थळ Archived 2011-12-03 at the Wayback Machine.