चर्चा:देवनागरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखात लिहिले आहे -

जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसाच्या तसा लिहिता येतो आणि लिहिलेल्या शब्दाचे हुबेहुब उच्चारण करता येऊ शकते, जे इंग्लिश भाषा किंवा इतर लिप्यांमध्ये शक्य नाही.


याला संदर्भ दिलेला नाही आणि या ऍसर्शनला (मराठी प्रतिशब्द?) माझा आक्षेप आहे.

इंग्लिशपासून कानडी व अनेक आफ्रिकन भाषेत असे उच्चार आहेत ज्यांना देवनागरीत लिहिणे अशक्य आहे (आत्तापर्यंत तरी प्रयत्न पाहिलेले नाहीत.)

उदा. जपानी सम्राट 'मैजी' - यातील 'मे'चा मूळ जपानी उच्चार धड 'मेजी' (मेजातील) नाही, 'मेइजी' (घेइ छंद मकरंद मधील) नाही आणि 'मैजी' (मैत्रीतील)सुद्धा नाही. जपानीतील जाणकार याला दुजोरा देउ शकतील.

दक्षिण आफ्रिकेत क्सोसा जमात आहे. यांच्या नावातील 'क्स' हा खरे तर क्स नाही. तो 'क' आणि 'ख'च्या पलीकडला घशाच्या अगदी आतून येणारा आवाज आहे. इंग्लिश व डच वसाहतकारांनी सोय म्हणुन त्याचे शुद्धलेखन xhosa असे केले.

इतकेच काय, माय-मराठीत देखील 'चार चमचे' म्हणताना दोन प्रकारचे 'च' उच्चारले जातात, ज्याला नोटेशन नाही (उर्दुत नुक्ता असतो त्याप्रमाणे)

उदाहरणे असंख्य देता येतील. भाषातज्ञांनी यावर आपले मत द्यावे.

माझ्या मते वरील वाक्य या लेखातून काढावे.

आपले मत येथे कळवा.

अभय नातू 23:14, 4 डिसेंबर 2006 (UTC)

ता.क. इंग्रजी भाषा आहे, रोमन लिपी आहे. :-)

सहमत. वाक्य काढून टाकावे.
केदार {संवाद, योगदान} 06:27, 5 डिसेंबर 2006 (UTC)

उ.: सहमत[संपादन]

अभय, तुम्ही म्हणता ते खरे आहे. देवनागरी लिपी उच्चारानुसारी असल्यामुळे लेखनाकरिता सोय होते; परंतु जगातल्या कुठल्याही भाषेतले बहुतांश उच्चार देवनागरीत लिहिता येत असतील, सर्व नाहीत. अजून उदाहरण द्यायचे तर जर्मनमधील R/r चा उच्चार पडजिभेमागून येणार्‍या कंठ्य ध्वनींपैकी एक आहे. त्याचे उच्चारण देवनागरीतील 'र' ने सूचित होणार्‍या उच्चाराबरहुकूम होत नाही. Robert चा उच्चार काहीसा 'ग़ोबेर्त' असा उर्दू कंठ्य "ग़" सारखा आणि "रोबेर्त" मधल्या "र" सारखा असा मिश्र येतो. तरीही लेखन करायचे झाल्यास देवनागरी लिपीच्या मर्यादेत राहून "रोबेर्त" असेच केले जाते.
ते वाक्य असे लिहिले तर हरकत नसावी असे वाटते:-
जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि तुलनात्मकदृष्ट्या रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा सहजतेने लिहिलेल्या शब्दांचे हुबेहूब उच्चारण करता येऊ शकते.

--संकल्प द्रविड 23:44, 4 डिसेंबर 2006 (UTC)

"हुबेहूब", "जसेच्या तसे" या शब्दांना माझी हरकत आहे. देवनागरी ही phonetic लिपी आहे इतपतच ठेवावे.
असे लिहावे: जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये लिहिता येऊ शकतात आणि लिहिलेल्या शब्दांचे रोमन सारख्या non-phonetic लिप्यांपेक्षा सहजतेने उच्चारण करता येऊ शकते.
देवनागरीत विविध भाषांतील हुबेहूब उच्चार लिहिणे शक्य नाही. एकाच लिपीत लिहिले असूनही हिंदी आणि मराठी उच्चार बरेच वेगवेगळे असतात. त्यामुळेच हिंदी बोलणारी मराठी व्यक्ती, काही अपवाद सोडले तर, लगेच ओळखता येते.
केदार {संवाद, योगदान} 06:54, 5 डिसेंबर 2006 (UTC)

दुजोरा[संपादन]

तमिळ भाषेत दोन 'ळ' आहेत. इंग्रजीत त्यामुळे ते l आणि zh अशा प्रकारे लिहावे लागतात. तसं पाहिलं तर कुठलीच लिपी सर्वव्यापी असू शकत नाही, त्यामुळे हे वादातीत विधान काढून टाकणे बरोबर ठरेल. Ajitoke 03:33, 5 डिसेंबर 2006 (UTC)


दुजोरा नाही[संपादन]

मूळ लेखात जवळजवळ सर्व उच्चार आणि तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब हे शब्द आहेत. त्यामुळे ते विधान वादातीत नाही.--J--J १२:४६, ४ मे २००७ (UTC)

ज़, ऴ

नुक्ता देऊन मराठी च, झ, तमिळ ऴ व वेगळी मात्रा देऊन कानडी-तेलुगू र्‍हस्व एकार- ओकार देवनागरीत लिहिता येतात. बराहा टंकात ही सोय नाही, हा लिपीचा दोष नाही. इतर अनेक टंकात हे उच्चार लिहिण्याची सोय आहे. वैदिक संस्कृत तर जगातल्या कुठल्याच लिपीत लिहिता येत नाही. देवनागरी लिपीत अनेक दोष आहेत, पण जवळजवळ सर्व उच्चार लिहिण्यासाठी याहून उत्तम लिपी नाही.--J --J १२:५७, ४ मे २००७ (UTC)


J, वरील चर्चा बरीच जुनी आहे. मूळ विधान होते --

जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसाच्या तसा लिहिता येतो आणि लिहिलेल्या शब्दाचे हुबेहुब उच्चारण करता येऊ शकते, जे इंग्रजी किंवा इतर लिप्यांमध्ये शक्य नाही.

वरील चर्चेनुसार मी उद्धृत केलेले विधान चुकीचेच आहे. म्हणून ते बदलून आत्ताचे विधान --

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.

असे लिहिण्यात आलेले आहे. या विधानाबद्दल कोणताही वाद नाही.
मला वाटते की प्रमाण मराठीत नुक्ता नाही. असल्यास कृपया संदर्भ द्यावा.
अभय नातू १४:१८, ४ मे २००७ (UTC)