Jump to content

यू-बोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यू-बोट, यू-बूट किंवा उंटेरसीबूट या पहिल्यादुसऱ्या महायुद्धांदरम्यान कार्यरत असलेल्या जर्मनीच्या लढाऊ पाणबुड्या होत्या. शत्रूच्या, विशेषतः कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटिश साम्राज्याच्या व्यापारी नौकांचे तांडे हेरून ते बुडविणे व त्यांद्वारे रसदपुरवठा खंडित करणे ही या बोटींची प्रमुख कामगिरी होती.