मेघना नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघना नदी
मेघना व बांग्लादेशातील इतर नद्या दाखवणारा नकाशा
ह्या नदीस मिळते सुर्मा-मेघना नदी, पद्मा नदी


मेघना नदी (बांग्ला: মেঘনা নদী) ही बांग्लादेशमधील एक महत्त्वाची नदी आहे. गंगेचा त्रिभुज प्रदेश बनवणाऱ्या तीन नद्यांपैकी ही एक नदी आहे. ही नदी सुर्मा-मेघना नदी प्रणालीचा एक भाग आहे व नैऋत्य भारतात उगम पावणाऱ्या अनेक छोट्या नद्यांच्या संगमातून बांग्लादेशात मेघना नदी बनते. ही नदी पद्मा नदीला चंद्रपूर जिल्ह्यात मिळते व शेवटी भोला जिल्ह्यात बंगालच्या उपसागरास मिळते.

मेघना नदीच्या प्रमुख उपनद्या धलेश्वरी नदी, गुमटी नदीफेणी नदी या आहेत. ती तेतुलिया, शाहबाझपूर, हटिया व बामनी या चार प्रमुख मुखांद्वारे बंगालच्या उपसागरास मिळते. बांग्लादेशाच्या आत वाहणाऱ्या नद्यांमध्ये मेघना नदी सर्वाधिक रूंद आहे. भोला जिल्ह्याजवळ तिचे पात्र १२ कि.मी. रूंद आहे. तसेच दक्षिणेकडील भागात ही नदी सरळ रेषेत वाहते. शांत प्रवाहासाठी ओळखली जाणाऱ्या ह्या नदीत प्रत्येक वर्षी अनेक बोटींचे अपघात होतात. एम. व्ही. सलाहुद्दीन-२एम. व्ही. नासरीन-१ या प्रवासी नौका नदीत बुडाल्या व त्यात शेकडो व्यक्ती मरण पावल्या.

या नदीची सरासरी खोली १,०१२ फूट (३०८ मी) आहे तर कमाल खोली १,६२० फूट (४९० मी) आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत