Jump to content

तमिळ देवीस आवाहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तमिळ देवीस आवाहन(रोमन लिपी:Invocation to Goddess Tamil)
(तमिळ: தமிழ் தாய் வாழ்த்து, तमिळ ताय वाळत्तु)
हे तमिळनाडू राज्यातील "तमिळनाडू शासनाचे राज्यगीत" आहे.मनोन्मन्यम सुंदरम पिल्लै हे ह्या गीताचे रचनाकार आहेत.राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यक्रमाचा आरंभ ह्याच गाण्याने होतो व सांगता राष्ट्रगीताने होते.तमिळ भाषक तमिळ भाषेस आईचा दर्जा देतात व त्या अर्थाने तमिळ देवता किंवा देवीची मूर्तीस्वरूपात पूजा देखील करण्यात येते जीला तमिळअन्नै(अर्थ:तमिळ आई) असे म्हणतात.

मूळ तमिळ लिपीतील गीत

[संपादन]

मूळ तमिळ लिपीतील गीत खालीलप्रमाणे:

நீராரும் கடல் உடுத்த நில மடந்தைக் கெழிலொழுகும்
சீராரும் வதனமெனத் திகழ்பரதக் கண்டமிதில்
தெக்கணமும் அதிற்சிறந்த திராவிட நல் திருநாடும்
தக்கசிறு பிறைநுதலும் தரித்தநறும் திலகமுமே!
அத்திலக வாசனைபோல் அனைத்துலகும் இன்பமுற,
எத்திசையும் புகழ்மணக்க இருந்த பெரும் தமிழணங்கே!
தமிழணங்கே!
நின் சீரிளமைத் திறம்வியந்து
செயல் மறந்து வாழ்த்துதுமே!
வாழ்த்துதுமே!
வாழ்த்துதுமே!

गीताचा मराठी उच्चार

[संपादन]

नीरानुम् कडल् उडुत्त् निल मडनदैक् केळिलोळुकुम्
सीरानुम् वदनमेनद् दिकळ्परदक् कण्डमिदिल्
तेक्कणमुम् अदिर्सिरन्द द्राविड नल् तिरुनाडुम्
दक्कसिरु बिरैनुद्लुम तरित्तनरुम्
अद्दिलक वासनैपोल् अनैन्दुलकुम् इन्बमुर
ऍत्तिसैयुम् पुगळ्मणक्क् इरुन्दु पेरुम् तमिळणंगे!
तमिळणंगे !
निन् सिरिळमैद् दिरम्वियन्दु
सेयल् मरन्दु वाळत्तदुमे !
वाळत्तदुमे !
वाळत्तदुमे !

ह्या देशाची भूमी ही जणू समुद्राच्या पाण्याच्या मधोमध उठून दिसणारे पृथ्वीचे सुंदर मुख आहे, दख्खनची (दक्षिणेची) भूमी ही जणू तिचे कपाळ आहे ज्यावर धन्य द्राविड भूमीचा सुंगधीत कृपाशिर्वादरूपी टिळा आहे. ज्याप्रमाणे त्याचा सुगंध सर्वत्र जगात पसरत आहे त्याप्रमाणे सर्वोच्च देवी तमिळ आईची अधिसत्ता (राज्य) सर्वदूर पसरत आहे.तुझा जयजयकार असो,तमिळ आई (देवी),जीचा राजेशाही रुबाब (थाटमाट) परमानंद आणि विस्मयास प्रेरीत करतो.तमिळ आई ,तुझा जयजयकार असो !