हद्दपार शब्द
Appearance
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
रोजच्या वापरातून हद्दपार होत असलेल्या जुन्या मराठी शब्दांची / संकल्पनांची विषयनिहाय/स्थलनिहाय यादी.
भांडी
[संपादन]सुचवलेले वर्गीकरण
साठवण
[संपादन]घन
[संपादन]द्रव
[संपादन]- गुंड :सुमारे २०-२५ लिटर क्षमतेचे पाणी भरण्यास/साठविण्यास वापरण्यात येणारे पितळी वा तांब्याचे पात्र. [१]
- गंज
- भगोणं :ज्यात साठवण करता येऊ शकेल असं भांडं (पश्चिम महाराष्ट्र)
- पंचपात्री :तोटी असलेले गोल भांडे (उत्तर महाराष्ट्र), पाण्याची कोठी (अमरावती)
- डेचकी :एक प्रकारचे भांडे
- 'उखळ-धान इ. : धान्याचे वरचे आवरण काढण्यासाठी, उथळ खळग्यासारखे भासणारे कठिण दगडापासुन बनविलेले एक साधे यंत्र.हे कठिण लाकडाचेही असते.
- मुसळ-मुटकण्यासाठी(मारण्यासाठी/कुटण्यासाठी) असलेला कठिण लाकडाचा(शिसम/सागवान) सळ(दांडा)
- कांडप'/कांडणे-कांड(तुकडे)करण्याची क्रिया (खलबत्ता वापरून वा उखळ-मुसळ वापरून)
- जाते- धान्याचे पीठ दळण्यासाठी हाताने गोल फिरवावयाचा गोल व विशिष्ट आकार असलेला एकावर एक ठेवलेला दगड. यात खालचा दगड पक्का असून वरचा फिरत असल्यामुळे त्या दोहोत धान्य दळल्या जात असे. [२]
- शिंकाळे-दुध/दुभते/लोणी/दही इत्यादी मांजर वा तत्सम प्राण्यांपासुन वाचविण्यासाठी छपराला दोरीने उंच टांगण्यात आलेली वस्तु
- ताटाळे-ताट/झाकण्या ठेवण्यास वापरण्यात येणारे
- फुंकणी- एक प्रकारचा पाईपसदृष्य तुकडा. हा चुलीतील लाकडांना जाळ लावण्यास हवा फुंकण्यास वापरीत असत.
- भुश्याची शेगडी-लाकडाचा भुसा हे जळण म्हणून वापरून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी शेगडी
- कशेली
- कळशी-विहिरीवरून प्यायचे पाणी आणावयाचे एक अरुंद तोंडाचे व काठ असलेले सुमारे ५-८ लिटर क्षमतेचे पाण्याचे भांडे
- निखारे-कोळसा पेटल्यावर तयार होणारे व धग देणारे
- कळकणे-आंबट पदार्थ(ताक,दही इत्यादी) पितळेच्या वा काशाच्या(धातुच्या) भांड्यात बराच वेळ ठेवल्याने, त्याच्या आम्ल गुणांमुळे त्याची धातुशी प्रक्रिया होऊन तो पदार्थ दुषित होण्याची घडणारी रासायनिक क्रिया.
वाढप
[संपादन]ताटली
[संपादन]- ताम्हण, ताम्हन
- वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा)
- वेळणी (ताटली)
- तसराळे,
डाव
[संपादन]- ओगराळे,-कणिक/धान्य साठविलेल्या डब्यातुन ते काढण्यास वापरण्यात येणारा एक मोठया 'डावासारखी' वस्तु.
- 'भातवाढणं' 'भाताचा हात', 'थप्पी', थापी
भांडे
[संपादन]- फुलपात्र
* फिरकीचा तांब्या-प्रवासात पिण्याचे पाणी नेण्यासाठी सुमारे २ लिटर क्षमतेचा, पेचाचे झाकण व कडी असलेला तांब्या(लोटी)
इतर
[संपादन]- 'सारणी'
- 'दोमुखं'
- 'निवणी'
- 'अडणी'
- दुधाणी
- मेशरं/मशेरकं
- शेरकं/दशेरकं
- निठवं
- ओयरा
- थावर
- टोप-एक प्रकारचे उभट भांडे-याचा आकार इंग्रजी सैनिकाच्या टोपासारखा असतो म्हणून हे नाव.
- रोवळी (बुरडाची)
- बोगणी
- भगुलं
- सालकाढणं-आंब्याची/फळांची/फळभाज्यांची साल काढण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे साधे यंत्र.पूर्वी तळहातात मावण्याजोग्या शिंपल्यांना खोलगट भागात छिद्र पाडून त्याद्वारेपण साल काढता येत असे.
- कणगी-शेतीतील धान्य मोठ्या प्रमाणात साठविण्यासाठी वापरण्यात येणारी खोली.
- कलथा / उलथणं / काविलथा
- खलबत्ता
- सांडशी
- बंब-आंघोळीसाठी गरम पाणी लाकडे/जळण वापरून तापविण्यास वापरण्यात येणारा तांब्याचा सध्याच्या बॉयलरसदृष्य पण सुमारे २०-२५ लिटर पाणी क्षमतेचा बंब.
- हंडा - पाणी ठेवण्यास वापरण्यात येणारे एक धातूचे पात्र.
- चरवी- पाणी ठेवण्यास वापरण्यात येणारे एक हंड्या पेक्षा लहान पात्र.
- गडु=घडवा=तांब्या- हंड्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी हा उपयोगी पडतो.
- कोनाडा-खोलीच्या सर्व कोपऱ्यात, उजेडासाठी पणती/फुटकळ वस्तु ठेवण्यास करण्यात आलेली भिंतीतील खाच.
- तबक-पान,सुपारी,काथ,चुना ई. वस्तु ठेवण्यास वापरण्यात येणारी एक ताटसदृष्य वस्तु
- दिवालगिरी-भिंतीवरच्या खिळ्यास सहज अडकविता येणारी,केरोसिन हे जळण म्हणून वापरून उजेड देणारी वस्तु.
- रोळी- तांदुळाचा भात करण्यापुर्वी ते 'रोळुन', असल्यास, त्यातील खडे वेगळे करण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
- पेव-शेतीतील निघालेले धान्य उंदिर/किडा/मुंग्यांपासुन बचाव करण्यासाठी, बांसापासुन केलेल्या मोठ्या पेटाऱ्यास शेणाने लिंपून, खोल खड्डा करून ते ठेवण्यास करण्यात आलेली जमिनीखालील जागा.
- आढे - बहुदा माजघरात,बांबू अथवा पाट्या वापरून, त्यावर माती लिंपून तयार केलेले एक प्रकारचे सिलिंग(ceiling).त्याने छपराची उष्णता खाली खोलीत येण्यास प्रतिबंध होत असे. त्याने माजघर/ आढे असलेली खोली थंड रहात असे. आढ्यावर कधीतरी वर्षातून क्वचितच एक-दोनदा लागणाऱ्या वस्तू, मोठी भांडी इत्यादी वस्तू ठेवल्या जात असत.
- कुंकुपेटी- विवाहीत स्त्रियांचा साजश्रुंगार करण्यासाठी कुंकु,हळद, फणी,आकडे,गंगावन,रीबीन इत्यादी सामान वेगवेगळे ठेवण्यास खाणे असणारी आणि झाकणाच्या आतील बाजूस आरसा असणारी लाकडी पेटी(आजकालच्या मेकअप बॉक्सची पुर्वज)
- चंची-कमरेला नेसलेल्या वस्त्रास खोचण्यास येणारी, बंदांच्या साहाय्याने तोंड उघड-बंद करू शकणारी,चिल्लर पैसे,महत्त्वाच्या जडी-बुटी,सटर-फटर वस्तु ठेवण्यास उपयोगी पडणारी जाड कापडाची, अस्तर असणारी व कप्पे असणारी छोटी पिशवी.
- पोहरा- आड/ विहिरीतुन दोराच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडाची, गोल बुडाची, लोखंडी बादलीसारखी वस्तु. याचे बुड गोल असल्यामुळे ती ताबडतोब पाण्यात बुडत असे.विहिरीच्या पाण्यात डुंबणारा/पोहणारा तो 'पोहरा'.याची क्षमतासुमारे १०-१२ लिटर असते.'आडातच (पाणी) नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार' ही म्हण पोहरा या शब्दावरूनच तयार झाली आहे.
हेसुद्धा पाहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]उपक्रमावरील संबंधित चर्चा Archived 2017-10-31 at the Wayback Machine.
मराठी भाषापरिषद वरील लेख[permanent dead link]