श्वेतांबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – दिगंबर आणि श्वेतांबर. मूळ धर्म हा श्वेतांबर जैन धर्मच आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात दिगंबर पंथ उदयाला आला. सर्व तीर्थंकर श्वेतांबर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी हे अरिहंत बनून श्वेतांबरवृत्तीने धर्मोपदेश देतात. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सुती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्रे धारण करतात. श्वेतांबर पंथात तीन उपपंथ आहेत - मूर्तिपूजक, स्थानकवासी, आणि तेरापंथी स्थानकवासी. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करतात; स्थानकवासी व तेरापंथी श्वेतांबर मूर्तिपूजा करीत नाहीत. सर्वच जैन पंथीयांचा हिंसेला विरोध असल्याने ते संपूर्ण शाकाहारी असतात.