दिग्विजय सिंग
Appearance
दिग्विजय सिंग | |
कार्यकाळ ७ डिसेंबर १९९३ – ८ डिसेंबर २००३ | |
मागील | सुंदरलाल पटवा |
---|---|
पुढील | उमा भारती |
जन्म | २८ फेब्रुवारी, १९४७ इंदूर, मध्य प्रदेश |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
दिग्विजय सिंग ( २८ फेब्रुवारी १४७) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. ते १९९३ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
१९७७ साली प्रथम आमदार बनलेले दिग्विजय १९८४ ते १९८७ दरम्यान मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. ते १९८४ व १९९१ साली राजगढ लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे आठव्या व दहाव्या लोकसभेवर निवडून गेले. १९९३ साली त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर खासदारपदाचा राजीनामा दिला.
दिग्विजय सिंग रा.स्व. संघ व इतर हिंदूवादी संघटनांचे कट्टर विरोधक समजले जातात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत