सीमा (गणित)
Appearance
हा लेख कलन या गणिताच्या शाखेतील सीमा नामक संकल्पना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सीमा.
गणितानुसार, सीमा[१][२] किंवा मर्यादा[२] (इंग्लिश: Limit, लिमिट) म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.
सूत्रे लिहिताना, सीमा lim या रोमन लघुरूपाने दर्शवल्या जातात. उदा.: lim(an) = a. एखाद्या राशीने किंवा श्रेणीने सीमा गाठल्याचे दर्शवण्यासाठी उजव्या बाणाचे चिन्ह (→) वापरतात. उदा.: an → a.
संदर्भ व नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |